सांगलीत सहा वर्षाच्या मुलीवर दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी !
सांगली : KIMS UAIMS सांगलीमध्ये सहा वर्षाच्या मुलीवर एक अत्यंत दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली.
त्या मुलीला छातीत दुखणे, धडधड वाढणे आणि श्वास घेण्यास त्रास, अशी लक्षणे होती. तिच्या पालकांनी अनेक ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि तिला मुंबईला नेण्याचा सल्ला मिळाला होता.
KIMS UAIMS चे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत माने यांनी मुलीची तपासणी केली असता तिला “कोरोनरी कॅमेराल फिस्टुला” हा दुर्मिळ जन्मजात हृदयाचा आजार असल्याचे निदान झाले. हा आजार सर्वसामान्य लोकसंख्येत 0.002% इतक्याच दुर्मिळ प्रमाणात आढळतो, लहान मुलांमध्ये तर आणखीच कमी प्रमाणात दिसतो
डॉ. माने यांनी पालकांना सांगितले की, हा आजार ओपन हार्ट सर्जरी न करता, केवळ दुर्बिणीद्वारे बरा करता येतो. अवघ्या दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या हृदयातील फिस्टुला बंद करण्यात आला आणि तिला नवीन जीवनदान मिळाले. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशीच रुग्णाला डिस्चार्ज करण्यात आले. ही शस्त्रक्रिया महाराष्ट्राच्या उर्वरित भागात प्रथमच करण्यात आली असल्याने हा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे.
कोरोनरी कॅमेराल फिस्टुला म्हणजे काय?
हा हृदयाचा एक असामान्य आजार आहे, ज्यात हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमनी थेट हृदयाच्या कप्यात उघडते. त्यामुळे रक्तप्रवाहामध्ये गडबड होऊन हृदयावर ताण येतो.
लक्षणे: छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, धडधड वाढणे.
निदान : २D इको, एन्जिओग्राफी किंवा सीटी एन्जिओग्राफीद्वारे केले जाते.
उपचारः लहान प्रकरणांमध्ये केवळ तपासणी व औषधोपचार, परंतु गंभीर प्रकरणात दुर्बिणीद्वारे डिवाइस
असते.
युनिट हेड यांचे मत
या यशस्वी शस्त्रक्रियेबाबत KIMS UAIMS थे युनिट हेड निरंजन जोशी म्हणाले, “आमच्या रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे. ग्रामीण व लहान शहरातील रुग्णांनाही मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरात न जाता अत्याधुनिक उपचार मिळावेत, हा आमचा प्रयत्न आहे. अशा दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडणे म्हणजे आमच्या आरोग्यसेवा व्यवस्थेची ताकद आणि रुग्णांच्या विश्वासाचे प्रतीक आहे.” KIMS UAIMS सांगलीत झालेली ही दुर्मिळ शस्त्रक्रिया मुलीच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील रुग्णांसाठी आशादायक ठरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.