Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागात मेगा भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख

महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागात मेगा भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख
 

महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नोकरी मिळवणे अधिक अवघड होत आहे. याचा विचार करून राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागात भूकरमापक पदांसाठी १ ऑक्टोबर २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्जाची अंतिम तारीख २४ ऑक्टोबर आहे. या भरतीद्वारे एकूण 903 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत आणि राज्यातील विविध विभागामध्ये ही भरती राबवली जात आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी mahabhumi.gov.in या वेबसाइटवर किंवा Bhumi Abhilekh Recruitment 2025 pdf डाउनलोड करून अधिक माहिती घेऊ शकता. चला तर, जाणून घेऊयात या पदासाठी पात्रता काय आहे.


 
विभागनिहाय पदसंख्या

पुणे विभाग: 83

कोकण विभाग: 259

नाशिक विभाग : 124

छत्रपती संभाजीनगर विभाग : 210

अमरावती विभाग : 117

नागपूर विभाग: 110

एकूण : 903

पात्रता
(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा

(ii) 10वी उत्तीर्ण आणि ITI (सर्वेक्षक) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

याशिवाय, उमेदवाराकडे मराठी टंकलेखन कमीतकमी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन कमीतकमी 40 शब्द प्रति मिनिट या गतीसह शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २४ ऑक्टोबर २०२५ रोजी किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८ वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट दिली जाईल.

अर्ज करण्याची महत्त्वाची माहिती
अर्ज सुरु होण्याची तारीख: 1 ऑक्टोबर 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 24 ऑक्टोबर 2025

अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑनलाईन

ऑनलाइन अर्ज लिंक: ibpsreg.ibps.in/gomsep25
परीक्षा शुल्क

सामान्य प्रवर्ग (Open Category): 1000/-

मागासवर्गीय उमेदवार (Reserved Categories): 900/-

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.