शिंदेंच्या शिवसेनेचे रामदास कदम यांच्या आरोपाला ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट कराच, पण त्यासोबत ज्योती रामदास कदम यांनी १९९३ मध्ये जाळून घेतलं की जाळलं? त्याबाबतही नार्को टेस्ट करण्याची मागणी
मी करतो. रामदास कदम यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्यांनी केलेले आरोप
चुकीचे आणि खोटे आहेत. बाळासाहेबांच्या मृत्यूचेही राजकारण केले जातेय.
माणसं चोरली, पक्ष चोरले पण काही झाले नाही.त्यामुळे आता बाळासाहेबांच्या
मृत्यूचे राजकारण करून उद्धव ठाकरे वाईट असल्याचे दाखवण्याचे काम सुरू आहे.
अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांना प्रत्युत्तर
दिले.
रामदास कदम यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे. मातोश्रीवर रामदास कदम झोपलेला बाकडा मी शोधत आहे, असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेना नेते अनिल परब यांनी केलाय. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे कुणी घेतले? याचीही चौकशी झालीच पाहिजे? त्याशिवाय खेडमधील १९९३ मध्ये ज्योती रामदास कदम यांनी पेटवून घेतलं की पेटवलं? याचीही चौकशी करायला पाहिजे. त्या घटनेचे साक्षीदार माझ्याकडे आहेत, वेळ पडली तर मी त्यांना पुढे आणू शकतो, असे परब म्हणाले.
गृहराज्यमंत्र्यांच्या (योगेश रामदास कदम) आईने पेटवून घेतलं होतं. रामदास कदमांच्या मुलानेच त्याची चौकशी करावी. १९९३ च्या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. खेडमध्ये धुमाकूळ सुरू आहे. जमिनी बळकावल्या, लोकांना त्रास दिला जातोय, या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. रामदास कदम यांना मुख्यमंत्री का पाठीशी घालत आहेत? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.मुंबई मनपा त्यांची होऊ शकत नाही. त्यामुळे रामदास कदम यांना पुढे करायचे अन् मूळ मुद्द्यापासून दूर करायचं. शिशूपाल यांचे आता १०० गुन्हे पूर्ण झाले आहेत. त्यांचे सर्व पुरावे येणाऱ्या अधिवेशनात दाखवणार आहे. मुख्यमंत्री यांना इतके पाठीशी का घालतात? यांच्यामुळे मुख्यमंत्री डागाळलेले आहेत. ते वाळूचोर, माफियांना का वाचवत आहेत? माझा सवाल आहे. रामदास कदम यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावर माफी मागावी लागणार आहेच, अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपातील सत्य बाहेर आलेच पाहिजे? असे अनिल परब म्हणाले.
उद्धव
ठाकरे आणि रामदास कदम यांची नार्को टेस्ट करावी. मी शिवसेनाचा आमदार
म्हणून सांगतोय, १९९३ मध्ये ज्योती रामदास कदम यांनी जाळून घेतले की जाळून
घेण्याचा प्रयत्न केला, याचाही नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मी मागणी
करतोय, असे अनिल परब म्हणाले. रामदास कदम यांनी केलेले आरोप निराधार आहेत.
बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी शेकडो लाखो लोक होते. कोणताही मृतदेह
शवपेटीशिवाय ठेवता येतो का? त्यांचे डोकं ठिकाणावर नाही. डॉक्टरांनी
सांगितल्यानंतरच मृत्यू जाहीर झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.