वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर 'E-चालान'द्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाईत होणारा उशीर आता Artificial Intelligence (AI) च्या मदतीने कमी होणार आहे. यासाठी 'WhatsApp-Chatbot' प्रणाली तयार केली जात आहे. या सुविधेतून नागरिक थेट तक्रार नोंदवू शकणार असल्याने वाहतूक पोलिसांबरोबरच सामान्य नागरिकांचादेखील बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यात सहभाग राहणार आहे. बुधवारी (1 October) या नवीन प्रणालीची प्राथमिक चाचणी पार पडली.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीचे मोठे कारण म्हणजे नियमांकडे दुर्लक्ष करणारे आणि बेशिस्त वाहनचालक. उलट्या दिशेने वाहन हाकणे, 'Triple Seat' बाइक चालवणे, अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नलचे उल्लंघन करणे, चुकीच्या ठिकाणी गाड्या उभ्या करणे, विनाहेल्मेट प्रवास करणे, No Entry मध्ये वाहन नेणे असे प्रकार वारंवार घडताना दिसतात. या अव्यवस्थेला आळा बसावा म्हणून शहरातील विविध चौकांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते.'E-Challan' प्रणालीद्वारे पोलिसांकडून संबंधित वाहनाचा नंबर नोंदवणे, फोटो घेऊन त्यानंतर चालकाच्या नावावर दंडाची नोटीस पाठविणे या प्रक्रियेस बराच वेळ खर्ची पडतो. ही पद्धत आणखी जलद आणि सोपी व्हावी तसेच सामान्य नागरिकांनाही बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईत सहभागी होता यावे, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी 'WhatsApp Chatbot' ही AI आधारित नवी प्रणाली तयार केली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.जाधव यांनी सांगितलं की, ''पुणे वाहतूक पोलिसांनी याआधी PTP ॲप आणि AI आधारित CCTV कॅमेरे अशा विविध उपाययोजना राबवल्या आहेत. आता तयार करण्यात आलेलं हे Chatbot हे त्याच मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल आहे.'' या नव्या प्रणालीमुळे नागरिकांनाही Chatbot च्या माध्यमातून विनाहेल्मेट वाहन चालवणे, Triple Riding, चुकीच्या ठिकाणी वाहनं पार्क करणं अशा प्रकारांच्या छायाचित्रांसह वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी नोंदवता येणार आहेत. AI या स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या आधारे Chatbot प्राप्त झालेल्या माहितीकडे पाहून तिचं विश्लेषण करेल आणि तात्काळ संबंधित माहिती उपलब्ध करून देईल. त्यानंतर थेट वाहनचालकाच्या नावावर E-चलनाची दंडात्मक कारवाई केली जाईल. पारदर्शकतेसाठी Chatbot वर आलेली माहिती किमान 80 टक्क्यांपेक्षा जास्त अचूक असल्याची खात्री झाल्यावरच दंडात्मक कारवाई केली जाईल, असं जाधव यांनी सांगितलं.
ही प्रणाली पूर्णतः विकसित करून नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचा प्रयत्न - हिंमत जाधव
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी 'WhatsApp-Chatbot' प्रणाली तयार केली जात असून त्यासाठी Engineering क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जाते आहे. बुधवार (1 October) रोजी या प्रणालीची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आलेल्या अडचणी, त्रुटी दुरुस्त केल्या जात आहेत. पुढील 3 महिन्यांत ही प्रणाली पूर्णतः विकसित करून नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.