जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून प्राध्यापकाने १९ वर्षीय
विद्यार्थिनीवर केला अत्याचार; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करण्यास भाग पाडलं
अन्...
बंगळूर : बंगळूरमधील खासगी महाविद्यालयाच्या विभागप्रमुखाला पदवी विद्यार्थिनीला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून अत्याचार, छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. गेल्या महिन्यात एका १९ वर्षीय पदवी विद्यार्थिनीवर घरी बोलावून ४५ वर्षीय प्राध्यापक संजीवकुमार मंडल याने अत्याचार केले होते, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
२५ सप्टेंबर रोजी आरोपी प्राध्यापकाने जेवणाच्या बहाण्याने तिला घरी बोलावल्याचा आरोप विद्यार्थिनीने तिच्या तक्रारीत केला. पीडितेने टिळकनगर पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या आरोपी संजीवकुमार मंडलविरुद्ध गुन्हा दाखल आहे. मंडल हा विद्यार्थ्यांना कमी उपस्थितीचे कारण देत होता आणि पूर्ण गुण देण्याचे आश्वासन देऊन अत्याचार करत होता.मंडलने २ ऑक्टोबर रोजी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (बीसीए) च्या विद्यार्थिनीला घरी बोलावले. जेव्हा विद्यार्थिनी त्याच्या घरी गेली, तेव्हा मंडल घरात एकटाच होता. तिला जेवण दिले. तथापि, मंडल एकटाच असल्याने नाराज झालेल्या विद्यार्थिनीने ती निघून जाईल, असे सांगितले. त्यावर ''तुझी हजेरी कमी आहे. मला सहकार्य कर. मी तुला पूर्ण गुण मिळवून देण्यास मदत करेन. मग त्याने माझ्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करण्यास भाग पाडले.दरम्यान, मैत्रिणीचा फोन आला. मला तातडीने जावे लागेल, असे म्हटले आणि कशीतरी त्याच्या घरातून पळून आले, असे विद्यार्थिनीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. टिळकनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला. आरोपी प्राध्यापकाला अटक केली आणि नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.