Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महायुतीमध्ये मोठी घडामोड; एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ, भूमिकेकडे सर्वांचे लक्ष ?

महायुतीमध्ये मोठी घडामोड; एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ, भूमिकेकडे सर्वांचे लक्ष ?
 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यातच आता राज्यात वेगवान घडामोडी घडत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. राज-उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. तर दुसरीकडे महायुतीचा देखील फॉर्म्युला ठरला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनीच या प्लॅनिंगची माहिती दिली. त्यानुसार मुंबई महापालिकेत महायुती एकत्रित लढणार आहे तर ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाण्यात महायुतीबाबतचे सर्व अधिकार शिंदे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 
येत्या काळात होत असलेली निवडणूक विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची आहे. राज्यातील सर्वच पक्ष गेल्या सहा महिन्यापासून या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून काम करीत असल्याने काळ बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विरोधक आणि सत्ताधारी मंडळी एकमेकांना टार्गेट करीत असल्याने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वातावरण चांगलेच तापले असून या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 
 
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबई महापालिकेची निवडणुक तीन पक्ष मिळून लढणार आहेत, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. दरम्यान आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर मात्र मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात युती करण्याबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंद यांना देण्यात आले आहेत.

ठाण्यात महायुती झाल्यास जागा वाटपावेळी भाजपला ठाण्यातील काही जागा मिळाल्यास शिवसेना शिंदे गटाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महायुतीबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.



'या' कारणामुळे झाली शिंदेंची कोंडी
ठाण्यात महायुतीची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे नेमका काय निर्णय घेणार? ठाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांकडून देखील स्वबळाचा नारा देण्यात येत आहे, त्यामुळे आता या निवडणुकीबात उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत, महायुतीतील अंतर्गत समीकरणे आणि आगामी निवडणुका लक्षात घेता, या घडामोडी महत्त्वाच्या ठरत असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.