सांगली : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे वृद्धाचे दागिने लुटणार्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. प्रेम दीपक कांबळे (वय 21), तुषार शहाजी कांबळे (19, दोघे रा. सावर्डे, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि आकाश प्रकाश टिबे (22, रा. गोटखिंडी, ता. वाळवा, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. तिघांकडून चोरीतील दागिने आणि दुचाकी असा 4 लाख 5 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोटखिंडी येथे भीमराव धोेंडिराम पाटील हे दि. 29 सप्टेंबररोजी सकाळी गोटखिंडी ते मालेवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी तिघांनी त्यांची 3 लाख 45 हजार 690 रुपये किमतीची 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली होती. या घटनेची आष्टा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. दरम्यान, संबंधित चोरीतील तिघे चोरटे हे सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील जुना सांगलीवाडी टोलनाक्याजवळ चोरीतील सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकास मिळाली होती.त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सोन्याची चेन आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, संदीप गुरव, अरुण पाटील, उदयसिंह माळी, अतुल माने, रणजीत जाधव, शिवाजी शिद, सुरज थोरात, रोहन घस्ते, पवन सदामते, संकेत कानडे, अभिजीत माळकर, अशोक जाधव, सायबर पोलीस ठाण्याकडील करण परदेशी, अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.