वर्गात कुणी नव्हतं, महिलेसोबत 'नको त्या अवस्थेत' शिक्षकाला पकडलं, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूट करून केला व्हायरल
मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यातील उदयनगर संकूलच्या सरकारी प्राथमिक शाळेतून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या शाळेत एक शिक्षक महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी दोघांना पाहिलं, तसेच व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच ग्रामस्थांनी शिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. शिक्षक बराच काळ, अशा प्रकारचे वर्तन करीत होते, असं स्थानिक मंडळींनी सांगितलं. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार बिसाली ग्रामपंचायतीच्या झिरी मोहल्ला येथील सरकारी प्राथमिक शाळेत घडली आहे. विक्रम कदम असे शिक्षकाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच गावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी शिक्षकाला त्यांच्या कृतीबाबत फटकारले होते. मात्र, विक्रम यांचे अश्लील वर्तन सुरूच होते. शाळेत विक्रम महिलांच्या गळ्यात हात घालायचे. घटनेच्या दिवशी शिक्षक विक्रम एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले. शालेय विद्यार्थ्यांनी त्यांचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात व्हायरल केला. हे प्रकरण समोर येताच जिल्हा शिक्षण अधिकारी हरिसिंह भारतीय यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी तपास करण्यासाठी एक पथक रवाना केले आहे. चौकशी अहवाल समोर आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितलं. दरम्यान, शिक्षक विक्रम यांनी व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला. या घटनेबद्दल स्थानिक रहिवासी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. तसेच दोषी शिक्षकाला तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.