कसबे डिग्रज (ता. जत) येथील तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महाविद्यालयाच्या कर्तृत्ववान प्राध्यापकांचा सत्कार सोहळा पार पडला. संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. डी. डी. चौगुले यांना ए. पी. टी. आय. मुंबई तर्फे "सर्वोत्तम शिक्षक, प्राचार्य व संस्थापक" हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे त्यानिमित्त त्यांचा सन्मान करताना संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी चौगुले सरांचे योगदान नेहमीच विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील असे सांगितले.
डॉ. संतोष गेजगे यांची हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका येथे शिष्यवृत्तीसह पेटंट अभ्यासक्रमासाठी निवड निवड झाल्याबद्द्ल . संचालक डॉ. बाळासाहेब चोपडे यांनी गेजगे सरांचे अभिनंदन करत, त्यांची मेहनत खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे सांगितले. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजित दळे यांनी अल्झायमर्सवर औषधी संशोधन करून पाच भारतीय पेटंट्स पब्लिश केले आहेत. आहे त्यानिमित्त त्यांचा सन्मान वाईस चेअरमन पोपटराव डोरले यांनी करत "हे काम समाजासाठी आशेचा किरण आहे" असे कौतुकाचे शब्द काढले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किरण वाडकर यांनी केले. या वेळी संस्थेचे सचिव अजित प्रसाद पाटील, खजिनदार मिलिंद भिलवडे, संचालक महावीर चौगुले, प्रशांत अवधूत, नितीन चौगुले व अजित फराटे यांची उपस्थिती होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.