Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! सरन्यायाधीश गवई यांच्यावर कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न, भगवान विष्णुंवरील व्यक्तव्याने राडा

Breaking News! सरन्यायाधीश गवई यांच्यावर कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न, भगवान विष्णुंवरील व्यक्तव्याने राडा
 

कोर्टामध्ये युक्तीवाद सुरू होता, त्यावेळी वकिलाने सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं. गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं नाव राकेश किशोर असे आहे. सोमवारी सकाळी सुप्रीम कोर्टाचे कामकाज सुरू झाले होते. सुनावणीवेळी युक्तीवाद सुरू होता, त्यावेळी राकेश किशोर हा वकील पुढे केला अन् पायातील बूट काढून गवईंकडे फेकण्याचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षा रक्षाकाने त्याला ताब्यात घेतलं. कार्टाच्या बाहेर काढलं. कोर्टाबाहेर जाताना तो सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणा देत होता. हा सर्व प्रकार सुरू होता त्यावेळी CJI गवई शांत होते. ते म्हणाले की, अशा घटानामुळे आम्ही विचलीत होणार नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरूच ठेवा.

भगवान विष्णुच्या मुर्तीवरील टिप्पणीवर वाद -

खजुराहो येथील भगवान विष्णूच्या खराब झालेल्या मूर्तीशी संबंधित एका जुन्या प्रकरणात CJI यांनी केलेल्या टिप्पणीमुळे राकेश किशोर संतापले होते. गवई यांच्या त्या टिप्पणीचा अनेक हिंदूवादी संघटनांनी विरोध केलाय. सुरक्षा कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. ते म्हणाले की, एक व्यक्ती कोर्टात गोंधळ घालत होता. त्याला बाहेर काढण्यात आले आहे.
 
भगवान विष्णूवर काय म्हणाले CJI गवई ?
खजुराहो येथील विटंबना झालेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीचे पुनर्स्थापन करण्याच्या एका व्यक्तीच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश गवई यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, "जा आणि देवालाच काहीतरी करण्यास सांग, तू म्हणतोस की तू भगवान विष्णूचा कट्टर भक्त आहेस. तर जा आणि आता प्रार्थना कर. हे एक पुरातत्व स्थळ आहे आणि ASI ला परवानगी देण्याची गरज आहे. माफ करा." गवई यांच्या या त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचा विरोध केला होता. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.