सेव्हिंग अकाऊंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे, खरेदीसाठी डेबिट कार्डचा वापर करणे, सेव्हिंग करणे असे विविध कामे करण्यात येतात. पण तुमच्या दैनंदिन कामासाठी तुम्ही करत असलेल्या आर्थिक व्यवहारांची कधीही इन्कम टॅक्स विभागाकडून विचारणा होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का? होय... जर तुमचे सेव्हिंग बँक अकाऊंट
असेल आणि त्यामध्ये काही ठराविक व्यवहार झाल्यास तुम्हाला इन्कम टॅक्सकडून
विचारणा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला बचत खात्याच्या संदर्भातील नियम
माहिती असणे आवश्यक आहे.
बँक आणि इन्कम टॅक्स विभाग विशेषत: काही विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांवर लक्ष ठेवून असतात. जर हे व्यवहार तुमच्या उत्पन्नासोबत जुळले नाही किंवा व्यवहारात काही गडबड जाणवल्यास तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून याबाबतची विचारणा करणारी नोटीस धाडली जाऊ शकते. जाणून घ्या असे कोणते व्यवहार आहेत जे तुम्हाला टाळायला हवे.
जर तुम्ही एका आर्थिक वर्षात 10 लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा केली तर या संदर्भातील माहिती बँकेकडून इन्कम टॅक्स विभागाला देण्यात येते. हे बेकायदेशीर नाहीये पण तुम्हाला या पैशांचा स्त्रोत जाहीर करावा लागू शकतो.
30 लाखांहून अधिकच्या मालमत्तेचे व्यवहार
जर तुम्ही 30 लाख किंवा त्याहून अधिक किमतीची मालमत्ता खरेदी केली असेल किंवा विक्री केली असेल तर रजिस्ट्रार याबाबतची माहिती देतो. तुम्हाला पैसे कुठून मिळाले हे इन्कम टॅक्स विभाग तपासतो.
मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वारंवार काढणे
तुमच्या बँक खात्यातून वारंवार मोठ्या प्रमाणात पैसे काढणे किंवा अचानक कॅश फ्लो वाढल्यास बँक अलर्ट होते. अशा व्यवहारांमुळे बँकेला शंका येते आणि याबाबतची विचारणा केली जाऊ शकते. खासकरुन जर तुमच्या उत्पन्नासोबत हे व्यवहार जुळत नसेल तर.
अॅक्टिव्ह नसलेल्या बँक खात्यात अचानक मोठे व्यवहार
तुमचे एखाद्या बँकेत खाते आहे मात्र, अनेक दिवसांपासून ते बंद होते आणि अचानक ते अॅक्टिव्ह झाले. तसेच या खात्यावर मोठे व्यवहार झाल्यास बँक हे खाते फ्लॅग करु शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागू शकते.
परदेशात मोठ्या प्रमाणात खर्च
जर तुम्ही एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक परकीय चलनाचे व्यवहार केले असतील... जसे की, आंतरराष्ट्रीय कार्ड पेमेंट किंवा फॉरेक्स... आणि तुमचे उत्पन्न त्यापेक्षा कमी दिसत असेल तर यामुळे इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते.
बँकेचे व्याज आणि आयटीआरमधील फरक
जर तुमच्या बँकेने तुम्हाला तुमच्या खात्यातील रकमेवर व्याज दिला आहे. पण तुम्ही त्या बाबतची माहिती आयटीआर फाईल करताना दिली नाही आणि हे व्यवहार आयटीआरसोबत जुळत नसेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते. त्यामुळे आयटीआर फाईल करत असले तरी, तुमच्या सर्व बँक खात्याची, इन्कमची व्यवस्थित माहिती द्या.
(Disclaimer: हा मजकूर सामान्य माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचं किंवा सीएचं मार्गदर्शन नक्की घ्या.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.