Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किसी का खौफ ही बचा नहीं! दारूच्या नशेत मद्यपीने वाघाला समजले मांजर, जंगलाच्या शिकाऱ्यालाच पाजू लागला दारू; Video Viral

किसी का खौफ ही बचा नहीं! दारूच्या नशेत मद्यपीने वाघाला समजले मांजर, जंगलाच्या शिकाऱ्यालाच पाजू लागला दारू; Video Viral

वाघ हा जंगलातील एक धोकादायक शिकारी मानला जातो. त्याचा हल्ला इतका जबरदस्त असतो की प्राणीच काय तर माणसंही त्याच्या सामोर टिकू शकत नाही.

वाघाला पाहताच अनेकजण त्याच्यापासून दूर पळू लागतात, आपला जीव वाचवू लागतात. अशातच आता सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक मद्यपी वाघाला दारू पाजताना दिसून आला. वाघ ज्याला पाहून दुरूनच लोक पळून जातात, त्याला पाहून मद्यपी घाबरला नाही तर त्याने चक्क त्याच्यासमोर दारूची बॉटल पुढे केली. ही घटना आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सिवनी येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. एक माणूस दारूच्या नशेत होता, हातात बाटली घेऊन रस्त्यावरून हळू हळू चालत होता. अचानक त्याच्यासमोर एक वाघ आला. वाघ दिसला की माणूस आपला संयम गमावून पळून जाईल असे वाटत होते पण घडलं काही भलतंच. माणूस वाघाला मांजर समजतो आणि शांतपणे वाघाला गोंजारु लागतो, त्याचे डोके थोपटतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो माणूस वाघाला दारू देतानाही दिसतो. व्हिडिओमध्ये वाघ शांतपणे व्यक्तीजवळ उभा असल्याचे दिसते. पुढे व्यक्ती वाघाला जेव्हा दारू ऑफर करतो तेव्हा वाघ आपली मान फिरवतो. दारू पिल्यानंतर व्यक्तीचे वाढलेले धाडस आणि वाघाची शांतता आता अनेकांना थक्क करत आहे. घटनेचा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आला आहे.

हा व्हायरलव्हिडिओ @Sarcasm1105 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, "देशी दारू पुढे सर्वकाही फेल आहे" तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "हाहाहा… हे विनोदी आहे " आणखीन एका युजरने लिहिले आहे, "मला आश्चर्य वाटते की वाघाने त्याला काहीच केले नाही".

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.