सांगली : महाराष्ट्रातील जैन अल्पसंख्यांक समाज आर्थिक, शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी नेहमीच सकारात्मक पावले उचलत आला आहे. मात्र समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ठोस योजना राबविणे अत्यावश्यक आहे.
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला तातडीने शासकीय निधी उपलब्ध व्हावा यासाठी भाजपा जैन प्रकोष्ट विभागाचे राज्य उपाध्यक्ष आणि जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री रावसाहेब पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करून किमान 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. मागील वर्षी स्थापन झालेल्या या महामंडळास निधी प्राप्त न झाल्याने जैन समाजाच्या विकास योजनांना गती मिळू शकलेली नाही.या मागणीसंदर्भात श्री पाटील यांनी मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार सुरेशभाऊ खाडे आणि सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाची प्रत सुपूर्द केली. दोन्ही आमदारांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत मुख्यमंत्र्यांकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या योजना सुरू करण्यास हा निधी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय लवकरच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.