वाहतूक हवालदाराकडे सापडली 1,08,00,00,000 रुपयांची संपत्ती, 52 Kg सोनं, 234 Kg चांदी, दुबईत प्रॉपर्टी आणि... भ्रष्टाचाराचे भारतातील सर्वात मोठे प्रकरण
पोलिसांवर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप होतात. एका वाहतूक पोलिसाने 1,08,00,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार केला. जेव्हा त्याच्या घरी धाड पडली तेव्हा सापडलेले घबाड पाहून तपास अधिकारे शॉक झाले. 15 कोटींची रोडक, 52 Kg सोनं, 52 Kg चांदी अनेक मालमत्तांची कागदपत्रे तसेच अनेक अलिशान कार याच्याकडे सापडल्या. हे भारतातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रकरण मानले जोते. जाणून घेऊया हा भष्ट्राचारी वाहतूक पोलिस कोण आहे.
भोपाळमध्ये 108.25 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळा उघडकीस आला होता. लोकायुक्त पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली. भोपाळमध्ये पार्क केलेल्या एका कारमधून 52 किलो सोने आणि 234 किलो चांदीही जप्त करण्यात आली होती. लोकायुक्तच्या विशेष पोलिस आस्थापनेने (एसपीई) माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांमधून मालमत्ता जप्त केल्या. सौरभ शर्मा यांनी दुबईमध्ये गुंतवणूक केली असावी असे पुरावे आयकर आणि लोकायुक्त पथकांना सापडले होते. भ्रष्टाचार विरोधी लोकायुक्त पोलिसांच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, लोकायुक्त पोलिसांनी 18 आणि 19 डिसेंबर 2024 रोजी सौरभ शर्मा यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली.
एक हवालदार करोडपती कसा झाला?
सौरभ शर्मा हा ग्वाल्हेरचा रहिवासी आहे. त्याचे वडील तुरुंगात डॉक्टर होते. त्याने अवघ्या सात वर्षांत प्रचंड संपत्ती कमावली. 2017 मध्ये, वडिलांच्या मृत्यूनंतर सौरभ शर्माला वाहतूक विभागात कॉन्स्टेबल म्हणून अनुकंपा पदावर नियुक्ती मिळाली. त्यानंतर त्याने काही दिवस ग्वाल्हेरमध्ये तो कार्यरत होता. एका चौकीवर त्याची नियुक्ती झाली. हळूहळू, त्याने मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संबंध वाढवले. चौक्यांवर जमा होणाऱ्या पैशांचा तो हिशेब ठेवू लागला. त्यानंतर सौरभ भोपाळमध्ये स्थायिक झाला. सौरभची पत्नी दिव्या शर्मा सौरभचा व्यवसाय सांभाळायची. पेट्रोल पंप, क्रशर, जमीन आणि सोन्यातील गुंतवणुकीत दिव्याचे नाव समोर येत आहे. सौरभ शर्माने दोनदा एमपीपीएससी परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेतही पोहोचला. एकदा तो मुलाखतीच्या फेरीतही पोहोचला. वडिलांच्या निधनानंतर त्याला वाहतूक विभागात अनुकंपा पदावर नियुक्ती मिळाली.सौरभ शर्माचे घर भोपाळच्या अरेरा कॉलनीत आहे. घरातून वाहने आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या होत्या. ज्याची किंमत 22.1 दशलक्ष आहे. हिरे आणि सोन्याचे दागिने 5 दशलक्ष आणि 11.5 दशलक्ष किमतीची रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली. शिवाय, सौरभच्या ऑफिसमधून (चेतनच्या घरातून) 17.2 दशलक्ष किमतीची रोख रक्कम आणि 234 किलो चांदी जप्त करण्यात आली, ज्याची किंमत पोलिसांनी 21 दशलक्ष असल्याचे सांगितले आहे. सात नोटा मोजण्याच्या मशीन देखील सापडल्या. भोपाळच्या शाहपूर बी सेक्टरमध्ये 20,000 चौरस मीटरच्या भूखंडावर सौरभ एक शाळा बांधत असल्याचे प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कळले आहे. पथकाला अनेक बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे देखील सापडली आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे. भोपाळच्या मंदोरी गावात एका इनोव्हा कारमधून 24 किलो सोने आणि अंदाजे 10 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.