Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस बनायचं स्वप्न पाहता? महाराष्ट्रात 15,000+ रिक्त पदांसाठी पोलीस भरती सुरु, अर्ज कसा कराल ते वाचा

पोलीस बनायचं स्वप्न पाहता? महाराष्ट्रात 15,000+ रिक्त पदांसाठी पोलीस भरती सुरु, अर्ज कसा कराल ते वाचा


राज्य सरकारने पोलीस दलात 15,000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF आणि कारागृह शिपाई या पदांसाठी इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत महापोलिस पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

मुंबई: खाकी वर्दीची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये 15,000+ रिक्त पदे उपलब्ध असून, इच्छुक उमेदवार आता ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घेऊ शकतात.

भरती प्रक्रिया सुरू: 29 ऑक्टोबर 2025

अर्जाची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2025 (रात्र 11:59 पर्यंत)

परीक्षा प्रणाली:

शारीरिक चाचणी: 50 गुण

लेखी परीक्षा: 100 गुण
वयोमर्यादा अद्यतन: 2020-2025 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या

पोलीस शिपाई 12,624

पोलीस शिपाई - वाहन चालक 515

पोलीस बॅन्डस्मन 113

पोलीस शिपाई - SRPF 1,566

कारागृह शिपाई 554

महापोलिस पोर्टलला भेट द्या: https://www.mahapolice.gov.in/

"अद्ययावत माहिती" या पर्यायावर क्लिक करा.

"पोलीस शिपाई भरती 2024-25, माहिती" निवडा.

"ऑनलाईन अर्ज प्रणाली" वर क्लिक करा, "नवीन नोंदणी करा", आधार नंबर वापरून OTP पडताळणी करा.

ईमेल आयडीवर आलेल्या लिंकवर क्लिक करून मुख्य पृष्ठावर जा.

ईमेल आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि अर्ज पूर्ण करा.

लक्षात ठेवा: एका पदासाठी एकाच दिवशी संपूर्ण राज्यभर लेखी परीक्षा आयोजित केली जाईल. एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज करणारे अर्ज रद्द केले जातील.

अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF पूर्ण वाचा.

अर्ज भरताना सर्व सूचनांचे काटेकोर पालन करा.

ही भरती सर्व पोलीस घटकांमध्ये लागू आहे, त्यामुळे अर्ज करताना योग्य घटक निवडा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.