Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात भयमुक्त अभियान स्थापन प्रशासनाला जाग आणण्यासाठी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी अनोखे आंदोलन

सांगली जिल्ह्यात भयमुक्त अभियान स्थापन प्रशासनाला जाग आणण्यासाठी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी अनोखे आंदोलन


ऐतिहासिक स्टेशन चौकातून होणार अभियानाची सुरुवात स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना मागणी अर्ज करण्याचे प्रतीकात्मक आंदोलन संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठ्या ताकदीने भयमुक्त अभियान राबविणार सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षिततेसाठी जनजागृती करणार सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून भयमुक्त अभियान

राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कृषी, सहकार नाट्य, संगीत, प्रशासन अशा क्षेत्रातील अनेकांनी सांगली जिल्ह्याचा नावलौकिक सातासमुद्रापार वाढविला आहे. परंतु अलीकडच्या काळात सांगली जिल्हा गुन्हेगारी आणि नशाखोरीच्या कारणांमुळे बदनाम होताना दिसतो आहे. यामध्ये सत्ताधारी, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत; ते अपयशी ठरल्याचे दिसते आहे. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याने सर्वसामान्य जनता यामुळे भयभीत झाली आहे. सांगली जिल्ह्यातील वाढत असलेले गुन्हेगारी आणि नशामुक्ती याबरोबरच कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न या विषयावरती सर्वपक्षीय बैठक आज सांगली येथे पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. 


या भयभीत झालेल्या सांगलीकरांचे मनोबल वाढविण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यावर जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर प्रशासन यंत्रणेला खडबडून जागे करण्यासाठी समस्त सांगलीकरांचा आवाज म्हणून नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीच्या ऐतिहासिक अशा स्टेशन चौक येथून अनोख्या आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागणी अर्ज करण्याचे नागरिकांचे प्रतिकात्मक आंदोलन करून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसामान्य जनतेने भयमुक्त होऊन या अभियानामध्ये सामील व्हावं असा आवाहनही नशामुक्त अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत सांगली जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षिततेसाठी जनजागृती आवश्यक असल्याने यामध्ये सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवर कार्यकर्ते एकत्रित येऊन नशामुक्त अभियान घरोघरी पोहोचवतील, असा निर्धार यावेळी सर्वांनी केला. सुरवातीला स्वागत प्रास्ताविक कुलदीप देवकुळे यांनी तर आभार सुरेश ठेंगले यांनी मानले. या बैठकीमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, शिवसेना सांगली जिल्हा अध्यक्ष विशालसिंग राजपूत, शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे, सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रमोद भैय्या सूर्यवंशी,  राष्ट्रवादी शहराध्यक्ष सागर घोडके, लालू मिस्त्री, तानाजी रुईकर,  राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष महालिंग हेगडे, माजी नगरसेवक हरिदास पाटील, शिवसेना शहर प्रमुख मयूर घोडके, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश लोखंडे,  मिरज शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत व्हरकल, मनसेचे विभागाध्यक्ष श्रीधर करडे, शिवसेना वाहतूकसेनेचे प्रशांत मोतुगडे, मनसेचे शहराध्यक्ष सुरेश टेंगले, रोहित कबाडे, कुमार सावंत यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना अतिशय परखड, अभ्यासपूर्ण, सामाजिक स्वास्थ्य, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मांडणी केली. यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.