2.5 कोटी कॅश, ९००० स्वेअर फूटचं घर आणि क्लास वन सरकारी नोकरी, या वर्ल्ड कप विजेती खेळाडूला लागली लॉटरी
नवी मुंबई : भारताच्या महिला संघाने इतिहास रचला. कारण भारताच्या महिला संघाने प्रथमच वर्ल्ड कप जिंकला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय संघावर पैशांचा वर्षाव झाला. बीसीसीआयने ५१ कोटी रुपये दिले, तर आयसीसीने ४० कोटी रुपये दिले.
पण भारताच्या एका खेळाडूला तर आता बंपर लॉटरीच लागली आहे. कारण आता या खेळाडूला सरकारने अडीच कोटी रुपये रोख दिले आहेत, तर ९००० स्क्वेअर फूटाचे घर दिले आहे, त्याचबरोबर क्लास वन सरकारी नोकरीही दिली आहे. त्यामुळे भारतामधील सर्वात मालामाल ही खेळाडू ठरली आहे.
भारताने वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जिथे ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तिथेच खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली होती. जेमिमा रॉड्रीग्जने नाबाद शतक झळकावले आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर भारत फायनलमध्ये पोहोचला. भारताचा फायनलमध्ये सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार होता. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने भारताला वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत पराभूत केले होते. पण अंतिम फेरीत भारतीय संघाने त्या पराभवाचा वचपा काढला आणि वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कप विजयानंतर वर्ल्ड कप संघांतील खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होत आहे. पण भारताची एक खेळाडू तर चांगलीच नशिबवान ठरली आहे. कारण या खेळाडूला आता राज्य सरकारने चांगलेच मालामाल केले आहे.
आंध्र प्रदेशचे सरकार कधीही खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी सरसावलेले असते. आता महिलांच्या वर्ल्ड कपनंतरही आंध्र प्रदेशच्या सरकारने आपला खेळाडूला चांगलेच मालामाल केले आहे. आंध्रप्रदेश सरकारने अडीच कोटी रोख, ९००० हजार स्केअरफूटचे घर आणि क्लास वन पदाची सरकारी नोकरी भारताच्या वर्ल्ड कप संघातील श्री चरणी या खेळाडूला दिला आहे. भारतीय या वर्ल्ड कपमध्ये अडचणीत सापडला होता, त्यावेळी श्री चरणीने संघाला विकेट्स मिळवून देण्याची महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे भारताच्या या विजयातही तिचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे आता वर्ल्ड कप जिंकल्यावर तिला राज्य सरकारने चांगलेच बक्षिस दिले आहे. वर्ल्ड कप जिंकल्यावर आता भारतीय संघातील श्री चरणीला राज्य सरकारने चांगलेच मालामाल केल्याचे समोर आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.