Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमचा फोन आहे धोक्यात! सरकारने 'या' 4 कंपनीचे मोबाईल वापरणाऱ्यांना दिला इशारा; पटकन करा 'हे' काम नाहीतर...

तुमचा फोन आहे धोक्यात! सरकारने 'या' 4 कंपनीचे मोबाईल वापरणाऱ्यांना दिला इशारा; पटकन करा 'हे' काम नाहीतर...


तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन हॅकर्सच्या निशाण्यावर आहे..भारत सरकारच्या सायबर सुरक्षा संस्था CERT-In ने अँड्रॉइड डिव्हाइसेससाठी हाय रिस्क हॅकिंगचा इशारा जारी केला आहे. या त्रुटींमुळे हॅकर्स तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात, खाजगी डेटा चोरू शकतात किंवा मालवेअर बसवू शकतात.

सॅमसंग, शाओमी, वनप्लस, रिअलमी, मोटोरोला, व्हिवो, ओप्पो आणि गुगल पिक्सेलसारख्या प्रमुख ब्रँड्सचे लाखो यूजर्स प्रभावित आहेत. CERT-In च्या मते, ही समस्या Android 13, 14, 15 आणि 16 varient वर आहे. मार्केटमधील बहुतेक स्मार्टफोन, टॅब्लेट, वेअरेबल्स आणि आयओटी डिव्हाइसेस असुरक्षित ठरू शकतात. या भेद्यता क्वालकॉम, मीडियाटेक, एनव्हीआयडीए, ब्रॉडकॉम आणि युनिसॉक यासारख्या हार्डवेअर सॉफ्टवेअर घटकांमुळे उद्भवल्या आहेत. गुगलच्या नोव्हेंबर २०२५ सिक्युरिटी बुलेटिनमध्ये त्यांची ओळख पटली.

काय करावे? CERT-In चे तात्काळ उपाय
अपडेट्स ताबडतोब इंस्टॉल करा: सिस्टम आणि अॅप्सचे नवीनतम सिक्युरिटी पॅचेस लावा.

ऑटो अपडेट्स ऑन ठेवा: नेहमी स्वयंचलित अपडेट्स सक्रिय करा.

अज्ञात सोर्स टाळा: थर्ड पार्टी अॅप्स किंवा फाइल्स डाउनलोड करू नका.

Google Play Protect वापरा: फोन स्कॅन करून धोके शोधा.

लिंक्स पाहताना सावधगिरी: ईमेल किंवा मेसेजमधील अनोळखी लिंक्स अटॅचमेंट उघडू नका.

हा धोका इतका गंभीर आहे की हॅकर्स वैयक्तिक फोटो, बँकिंग डिटेल्स, पासवर्ड चोरू शकतात किंवा क्लाउड खाती हॅक करू शकतात. सायबर फसवणुकीचे बळी ठरण्याची शक्यता वाढली आहे. तज्ञ म्हणतात, सामान्य यूजर्ससुद्धा या जोखमीत आहेत. त्यामुळे आजच पटकन तुमचा मोबाईल अपडेट करून घ्या

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.