555 बीडी या प्रसिद्ध बीडी कंपनीचे मालक सुरेशचंद्र अग्रवाल यांच्यी मुलानेच हत्या केल्याची घटना घडलीय. यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. 555 बीडी कंपनीचा देशातील अनेक राज्यांमध्ये व्यवसाय आहे. अनेक दशकांपूर्वी सुरेश अग्रवाल यांनी बीडीचा व्यवसाय सुरू केला होता. मथुरेत ते कुटुंबासह राहत होते. ७५ वर्षीय सुरेशचंद्र अग्रवाल यांच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.
सुरेशचंद्र अग्रवाल यांच्यावर मुलगा नरेश अग्रवाल यानं गोळ्या झाडल्या. नरेशने बंगल्यातच अचानक गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. वडिलांच्या हत्येनंतर त्यानं स्वत:लाही गोळी झाडून घेत संपवलं. नरेशनं या हत्येसाठी स्वत:च्या नावावर असलेली परवानाधारक बंदूक वापरली असून ती जप्त करण्यात आलीय. 31ऑक्टोबरला रात्री ही घटना घडली.
555 बीडी कंपनीचा उद्योग अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. सुरेशचंद्र यांनी व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर काही वर्षातच वेगानं हा व्यवसाय वाढवला. कोट्यवधींची उलाढाल असलेला व्यवसाय आता पुढची पिढी सांभाळत आहे. दरम्यान, त्यांच्याच मुलाने गोळ्या झाडून हत्या केल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.अग्रवाल कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरला रात्री सुरेशचंद्र आणि त्यांचा मुलगा नरेश यांच्यात दारूवरून वाद झाला. नरेश घरातच दारू पीत होता आणि याला सुरेशचंद्र यांनी विरोध केला. रात्री ९ वाजता यातून वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेत नरेशनं वडिलांवर गोळीबार केला.
वडिलांवर गोळी झाडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं समजताच नरेश हादरला. त्याला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. यातूनच त्यानं स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराच्या घटनेनं कुटुंबिय घटनास्थळी पोहोचले असता सुरेशचंद्र आणि नरेश एकाच खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. दोघांनीही रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.