मुंबई :- प्रशासन हादरलं! तब्बल 80 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश; सहाय्यक आयुक्तांनीच रचला कट, जाळ्यात अडकले IPS, अभिनेत्यासह मोठे मासे
महायुती सरकारच्या काळात प्रशासनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जात आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या घरावरील छापेमारीत मोठी रोकड हाती लागल्याचंही अनेकदा दिसून आलं आहे.
तर दुसरीकडे इन्कम टॅक्स विभागाने विदर्भात केलेल्या मोठ्या कारवायांमध्ये अंदाजे 20 हजार कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. यानंतर आता मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांबाबत हादरवणारी बाब समोर आली आहे.मुंबई महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताने वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास स्वस्त दरात घरे मिळतील, असं आमिष दाखवत थेट वरिष्ठ पोलिस, पालिका अधिकारी यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्यालाही गुंतवणूक करण्यास भाग पाडत तब्बल 80 कोटींची रक्कम हडपल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी व्यावसायिकाने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, संबंधित सहाय्यक आयुक्तांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी संबंधित सहाय्यक आयुक्ताच्या वतीनं भारतीय वंशाचा ब्रिटीश व्यावसायिक निशित पटेलने रक्कम स्वीकारली होती, मात्र सहायक आयुक्ताने आता याप्रकरणी हात झटकल्यानं हे प्रकरण व्यावसायिक पटेल यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे.
मुंबई महापालिकेच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांनी अनेकांना पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. भविष्यात फायदा होईल, असे प्रलोभनं दाखवत स्वतःच्या जबाबदारीवर या सर्वांशी साधारण दीड वर्षांपूर्वी प्रत्यक्ष चर्चाही केली. यातील अनेक बैठका परळच्या एफ साऊथ विभाग कार्यालयात पार पडल्या. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात गुंतवणूकदार असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यानं तर तब्बल 15 किलो सोनं आणि 1.89 कोटी रोख, तर अन्य एका अधिकाऱ्याने तब्बल 8 कोटी रुपये गुंतवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे वांद्रे येथे पुनर्विकास प्रकल्प राबविणाऱ्या विकासकास अर्थसहाय्याची आवश्यकता नव्हती; मात्र, त्यास निकड असल्याचा आभास निर्माण करून या सहाय्यक आयुक्ताने सुमारे 80 कोटी रुपये गुंतवणूक स्वरूपात स्वीकारले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एकाही गुंतवणूकदाराने बांधकाम व्यावसायिकाची प्रत्यक्ष भेट न घेता, प्रकल्पाचा आराखडा, कागदपत्रे न पाहता, कोणतीही चौकशी न करता निव्वळ या सहाय्यक आयुक्ताच्या शब्दावर इतकी मोठी रक्कम गुंतवल्याचा दावा पटेल यांनी केला. या व्यवहारांत आपण फक्त 'पोस्टमन' म्हणून काम केल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. पटेल यांनी केलेल्या आरोपांनुसार ते या गुंतवणूकदारांना ओळखत नव्हते.
व्यवसायासाठी मी सहाय्यक आयुक्ताकडून कर्ज घेतले होते. ती मी व्याजासह वेळेत चुकवल्याने त्यांच्याशी माझा परिचय वाढला. त्यावरूनच त्याच्या सूचनेवरून वरील प्रत्येक गुंतवणूकदाराची रक्कम त्या-त्या ठिकाणी जाऊन आणली. ती त्याचदिवशी सहाय्यक आयुक्ताच्या हवाली केली; मात्र काही दिवसांनी त्याने नियोजित कटानुसार ही रक्कम मी लाटल्याचा कांगावा केला. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने पैशांसाठी माझ्याकडे तगादा लावला, असे पटेल यांनी सांगितले. पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्यासह सीबीआय आणि ईडीकडे लेखी तक्रार करून न्याय मागितला आहे. पटेल यांच्या तक्रारीनुसार, सहाय्यक आयुक्ताने भाडोत्री गुंडांकडून 4 ऑक्टोबरला त्यांचे अपहरण केले. खार येथील त्यांच्या कार्यालयात शासकीय अधिकारी, महिला पोलिस शिपाई, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हॉटेल व्यावसायिक आणि दोन अनोळखी बाउन्सरने बंदुकीच्या धाकाने अमानुष मारहाण केली, तसेच गोमांस खाऊ घालण्याचाही प्रयत्न केला. तुझ्या पत्नीवर बलात्कार करू, मुलांचे हातपाय तोडू, तुला जीवे मारू, अशा धमक्या देत 60 कोटींची खंडणी मागितली.
बंदुकीच्या धाकात वदवून घेतले...
अपहरण केल्यानंतर सहाय्यक आयुक्ताने पटेल यांचे दोन मोबाईल फोन हिसकावून घेत गुंतवणुकीच्या रकमेबाबत स्वतः दिलेल्या सूचना, ती रक्कम मिळाल्याची खात्री देणारे मेसेज, व्हॉइस रेकॉर्ड, कागदपत्रे, नोंदी इत्यादी पुरावे डिलीट केले. डोक्यावर बंदूक लावून मी या गुंतवणूकदारांना पैसे देणे लागतो, असे माझ्याकडून वदवून घेतल्याचा पटेल यांचा दावा आहे.
मारहाणीचे चित्रीकरण
या व्यक्तींनी दोन तास चाललेल्या छळाचा मोबाईलद्वारे व्हिडिओ काढला. तो आपल्या मित्रांना पाठवला. मित्रांनी तो आपल्याला पाठवला, असे पटेल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हा व्हिडिओ 'सकाळ'कडे उपलब्ध आहे.
सहाय्यक आयुक्ताने आरोप फेटाळले
पालिकेच्या सहाय्यक आयुक्ताशी याबाबत संपर्क साधला असता, निशित पटेल हा एजंट आहे. त्याने टीओटी (ट्रान्स्फर ऑफ टेनन्सी) ॲग्रिमेंट करून माझ्यासह सुमारे 60 जणांची फसवणूक केली. माझ्यासह सर्वांनी ही गुंतवणूक वैध मार्गाने अर्थात धनादेशाद्वारे, आरटीजीएसद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले. खातरजमेसाठी हे करार किंवा बँक व्यवहारांच्या नोंदीबाबत विचारणा केली असता सहाय्यक आयुक्ताने त्यास नकार दिला. आम्ही पटेलला कायदेशीर नोटीस पाठवू, असे मात्र त्याने स्पष्ट केले.मी एक सर्वसामान्य व्यावसायिक आहे. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून शहानिशा न करता एक अभिनेता, आयपीएस अधिकारी कोट्यवधी रुपये गुंतवू शकतात का? दुसरे असे की एकाही गुंतवणूकदाराने पोलिस तक्रार केलेली नाही. या सहाय्यक आयुक्ताने माझीच नव्हे तर सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.- निशित पटेल, तक्रारदारकोणाची किती गुंतवणूक?वरिष्ठ आयपीएस अधिकारीराज्य पोलीस दलात महत्वाच्या शाखेचे प्रमुख असलेल्या या अधिकाऱ्याच्यावतीने त्याच्या मुलाने एक कोटी रोख ऑपेरा हाऊस परिसरात दिले.अतिरिक्त पोलीस आयुक्त- या अधिकाऱ्याच्या वतीने मंत्रालयजवळील वाईन शॉप चालकाने 50 लाख रुपये रोख दिले.न्यायपालिकेतील निवृत्त अधिकारी- सांताक्रूझ येथील एका हवाला ऑपरेटरद्वारे दोन टप्प्यात 2 कोटी रुपये दिले.पोलिस अधीक्षक- झवेरी बाजार येथील.व्यावसायिकाकरावी 2.5 कोटी रुपये रोख गुंतवलेपोलिस उपायुक्त- राज्य पोलीस दलातील अत्यंत महत्वाच्या शाखेत नियुक्त या अधिकाऱ्याने मुंबई बाहेरील निवासस्थानी 1.89 लाख रुपये रोख आणि 15.5 किलो सोने(तेव्हाची किंमत 12.68 कोटी) गुंतवणूक म्हणून दिले.एक अभिनेतानृत्यात तरबेज, चित्रपट निर्माता आणि कसलेल्या बॉलीवूड अभिनेत्याने कुटुंबाच्यावतीने एकूण 28 कोटी रुपये गुंतवले. यातील 20 कोटी रुपये रोख तर 8 कोटी खासगी वित्त संस्थेमार्फत गुंतवले.सरकारी अधिकारी- ठाणे येथे राहणाऱ्या या अधिकाऱ्याने 8 कोटी रुपये रोख एकाचवेळी गुंतवले. हा अधिकारी पटेल यांच्या तक्रारीनुसार अपहरणात, मारहाणीत सहभागी होता.पालिका उपआयुक्त- सांताक्रूझ येथील तयार कपड्यांच्या दुकानात 2 कोटी रुपये रोख आणून दिले.पालिका अभियंते- पालिकेच्या दोन अभियंत्यांनी एकूण 3 कोटींच्या आसपास रोख गुंतवले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.