Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजयनगर प्रभाग 9 मधून सुनीता काळे महापालिका निवडणूक लढविणार

संजयनगर प्रभाग 9 मधून सुनीता काळे महापालिका निवडणूक लढविणार


सुनीता काळे या सामाजिक कार्यकर्ते राम काळे यांच्या मातोश्री आहेत. प्रभाग 9 मध्ये राम काळे यांचा मोठा जनसंपर्क आहे. मागच्या वेळी काळे यांच्या पत्नीचा थोडक्या मतांनी पराभव झाला असला तरी त्याचं मतदाराचा विश्वास न तोडता राम काळे यांनी आता मातोश्री सुमन काळे निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे..

संजयनगर प्रभाग 9 मधून सुनीता काळे महापालिका निवडणूक लढाविणार आहेत. त्यांचे सुपुत्र राम काळे यांनी याबाबत माहिती दिली. सर्वसामान्य कुटुंबातील सुनीता काळे या प्रभाग 9. मध्ये सक्रिय आहेत. विविध सामाजिक उपक्रम, प्रभागात भागातील साफसफाई, कोरोना कळत जेवण वाटप, कपडे वाटप, याचबरोबर रोगराई पसरली त्यावेळी धूर फवारणी,

डोळ्याचे ऑपरेशन, दवाखान्यातील गरजू लोकांचे भरमसाठ बिल आलेले कमी करायला भाग पाडणे, ज्यांना कोण नाही त्यांचे ऑपरेशन करून दिले. प्रभागात लाईट बसवणे, व गरजू लोकांना मदत आदी कामे सुनीता काळे करत आल्या आहेत.

या भागात गणपती उत्सव, दुर्गादेवी उत्सव, व महिलांना उपयोगी कार्यक्रम, शाळेतील मुलांना वही वाटप, व ऍडमिशन करून देणे शिवजयंती आदी उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. प्रभागात गणपती मंदिर व दर वर्षी 1500 लोकांचा महाप्रसाद त्यांच्याकडून केला जातो. नागरिकांसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड काढून देण्यासाठी सुनीता काळे यांनी प्रयत्न केले आहेत.

प्रभागात स्वच्छतेचा कुठेही प्रश्न निर्माण झाला तर महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने वेळोवेळी साफसफाई केली जाते. याचबरोबर महापालिका स्वच्छता कर्मचारी यांना काही अडचणीच्या वेळी त्यांनी मदतही केली आहे. प्रभाग 9 मध्ये रस्ते, गटारी याकडे लक्ष देत गुंठेवारी भागातील लोकांचे प्रमाणपत्र काडून देण्यासाठी सुनीता काळे या काम करत आहेत.

मागील निवडणुकीत त्यांच्या सुनबाई यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी मात्तबरं उमेदवाराना त्यांनी टक्कर दिली होती. आता स्वतः सुनीता काळे यांनी स्वता निवडणूक रिंगण्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी काळे यांनी प्रभाग 9 मध्ये घरभेटी, विविध कार्यक्रम या माध्यमातून जनसंपर्क कायम ठेवला आहे. त्यांना प्रभागातून उदंड प्रतिसाद मिळत आहेत. त्यांचे पुत्र राम काळे यांच्या माध्यमातून त्यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर करत तयारीला वेग दिला आहे. मात्र त्या कोणत्या पक्षातून लढणार याबाबत लवकरच स्पष्टता होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.