राज्यातील राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगाच्या दोन पत्रांमुळे उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. ज्या डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक आहे, त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी एक पत्र जारी केलं. त्यानंतर ते पत्र आज मंगळवारी रद्द केलं. पहिलं पत्र रद्द केल्यानंतर आज नव्याने काढलेल्या शुद्धीपत्रामुळे राज्यातील सर्वच उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. ज्या डमी उमेदवारांनी पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह अर्ज दाखल केला असेल त्यांचेच अर्ज पात्र ठरणार आहेत. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका छोटे पक्ष आणि शहर विकास आघाड्यांना बसणार आहे.
नेमका काय निर्णय घेतला?
नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या डमी उमेदवाराच्या नामनिर्देन अर्जात एक सूचक असल्यास डमी उमेदवाराचा अर्ज बाद होणार आहेत. डमी उमेदवाराने पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह नामनिर्देशन अर्ज सादर केला असल्यास उमेदवार अपक्ष म्हणून पात्र ठरणार आहे.डमी उमेदवाराने माघार न घेतल्यास अपक्ष चिन्हांमधून मुक्त चिन्हांमधून एक चिन्ह देण्यात येईल. मुख्य उमेदवाराने माघार घेतल्यास पर्यायी उमेदवार हा पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकेल. राजकीय पक्षाने एकापेक्षा जास्त उमेदवारांना सूचनापत्र दिलं असल्यास कार्यवाही करावी.
कुणाला फटका बसणार?
निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे छोटे पक्ष आणि स्थानिक आघाड्यांना सर्वात मोठा फटका बसणार आहे. कारण या आघाड्यांचे उमेदवारांकडून सामान्यतः डमी उमेदवारांचे अर्ज एका सूचकासोबत भरलेले असतात. या नव्या शुद्धीपत्रामुळे अनेक उमेदवारांचे अर्ज धोक्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.