सांगली :-तू माझे स्टेटस का बघत नाहीस? थेट गेला महिलेच्या घरी अन्... तलवार काढून महिलेसोबत केलं भयानक कृत्य
मिरज पूर्व भागातील एका गावात समाजमाध्यमावर बोलत नाही म्हणून महिलेच्या घरासमोर येत घराच्या खिडकीवर, दारातील कुंड्यांवर आणि दरवाजावर एकाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली.
याप्रकरणी पीडितेने अमोल दिनकर चव्हाण याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तोडफोड रोखण्यास आलेल्या एका व्यक्तीवरही त्याने तलवारीने वार केला. सोमवार (ता. २०) ते गुरुवार (ता. ३०) कालावधीत ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित चव्हाण हा पीडितेला समाजमाध्यमावर 'तू माझे स्टेटस का बघत नाहीस? तु माझ्याशी बोलत का नाहीस? तू बोलली नाहीस तर मी तुझ्या घराकडे येणार,' असे मेसेज वारंवार करत होता. यासह 'तुलापण मारून टाकणार,' अशी धमकीही देत होता, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पीडितेने तिच्या पतीला सांगितल्यानंतर त्यांनी संशयिताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावर संशयिताने दारूच्या नशेत पीडितेच्या घराजवळ येत घराच्या खिडक्या, दारातील कुंड्या, तसेच दुचाकी आणि दरवाजावर कोयत्याने, तलवारीने मारून त्याचे नुकसान केले.
त्याला अडविण्यास आलेल्या शेजारच्या एका व्यक्तीवरही त्याने हातातील तलावारीने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.