पुन्हा शिवसेना फोडणार? उदय सामंत यांचा आमदारांचा वेगळा गट आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणातील सनसनाटी खुलासा
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू उदय सामंत हेच शिंदेंची शिवसेना फोडणार असल्याचा दावा अंधारे यांनी केला होता.
यामुळे महाराष्ट्रात तिसरी शिवसेना निर्माण होतेय का? उदय सामंत यांचा आमदारांचा गट आहे का? अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. या सर्व चर्चांचा मात्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. उदय सामंत यांनी झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' या विशेष कार्यक्रमात या प्रश्नाचे उत्तर दिले.
उदय सामंत शिंदेंच्या शिवसेनेतील एक गट घेऊन भाजपसोबत जाऊ शकतात असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. सामंत यांना उपमुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. भाजपने आधी शिवसेना फोडली आता शिंदे गट फोडतील अशी घणाघाती टीका अंबादास दानवेनी केली. शिंदेंचे काही नेते भाजपमध्ये जातील असा दावाही दानवेंनी केला होता. कॅबिनेट बैठकीला शिंदेंच्या मंत्र्यांनी दांडी मारली होती. यावर ते बोलत होते. अप्रत्यक्षपणे दानवे यांचा रोख उदय सामंत यांच्यावर होता.
शिवसेनेचा एक गट भाजपसोबत जाणार या सर्व आरोपांवर उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी दखल घेण्याइतका महाराष्ट्रातील मोठा नेता झालो आहे, यामुळे माझ्या नावाची चर्चा होते असं म्हणत उदय सामंत यांनी सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे यांना टोला लगावला. माझ्याकडे 30 आमदार 40 आहेत असं ते म्हणातात. त्यांना हे देखील माहित असले पाहिजे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंवर का नाराज होत्या? त्या शिवसेनेत कधी येणार होत्या? त्या दिल्लीत खासदार नरेश म्हस्केंना का भेटल्या? तसंच अंबादास दानवे एकनाथ शिंदेंना किती वेळा आणि का भेटले याची उत्तरं त्यांनी द्यावीत, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.
एकनाथ शिंदे यांनी मला मोठ्या पदापर्यंत पोहचवले. एकनाथ शिंदेना कोणी त्रास देत असेल अशी वेळ आली, तर मी ढाल बनून उभा राहिल. आमच्या पक्षात एकच गट आहे शिवसेना म्हणून हे मी प्रामाणिकपणे सांगतो. ज्या व्यक्तीने मला राजकारणात मोठ केलं त्या व्यक्तीच्या मी कधीच विरोधात जाणार नाही. कधीच अशा व्यक्तीविरोधात कटकारस्थान रचणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला. 2014 ला मी राष्ट्रवादी सोडली. शरद पवार माझ्याशाी 5 ते मिनीट बोलत होते. त्यांच्याशी मी आजही बोलतो असं देखील उदय सामंत म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.