Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बिहार निवडणुकीत एनडीएचा विक्रमी विजय; सांगलीत भाजपकडून जल्लोष आणि आतषबाजी

बिहार निवडणुकीत एनडीएचा विक्रमी विजय; सांगलीत भाजपकडून जल्लोष आणि आतषबाजी


सांगली दि. १४ नोव्हेंबर : बिहार विधानसभेच्या ताज्या निकालांनी देशातील राजकीय वातावरणाला नवचैतन्य प्राप्त झाले असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळविलेला अभूतपूर्व विजय हा विकासाच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेला ठाम विश्वास असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त नेतृत्वाला मिळालेला हा जनादेश सशक्त भारताच्या दिशेने देशाची मजबूत पावले असल्याचे सांगली भाजप पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

या विजयाचा आनंद सांगलीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप सांगली शहर जिल्हा आणि भाजप सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जल्लोष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारनंतरच कार्यकर्त्यांची गर्दी कार्यालयाच्या परिसरात वाढत गेली आणि निकाल स्पष्ट होताच विजयी घोषणा, ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदाचा महापूर उसळला. परिसरात "भारत माता की जय", "नरेंद्र मोदी जिंदाबाद", "एनडीए विजयालाच जय" अशा घोषणा घुमत होत्या.
विजय उत्सवात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी बिहारच्या सुजाण जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, हा निकाल देशाच्या विकासाभिमुख राजकारणाला मिळालेला जनादेश असल्याचे सांगितले. आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, “बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा विकासाच्याच बरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा विजय केवळ एनडीएचा नसून संपूर्ण देशाच्या प्रगतीचा विजय आहे.महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांनी बिहारात मोठा विश्वास निर्माण केला असून या मतांच्या रूपाने त्याचीच दाद मिळाली आहे.” 
यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीदेखील भविष्यातील विकासकामांना गती देण्यासाठी भाजप सज्ज असल्याचे सांगितले. सांगलीतील या जल्लोष सोहळ्याने एनडीएच्या विजयाची छटा शहरातही उमटली असून, पुढील काळात केंद्र आणि राज्य पातळीवरील विकास प्रकल्पांना मिळणारी गती बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही दिसून येईल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, स्मिता भाटकर, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, विजय साळुंखे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.स्वातीताई खाडे, सौ.सुमनताई सुरेशभाऊ खाडे, सौ.मंजिरी गाडगीळ, सर्व माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, मंडल पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.