सांगली महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. रस्ते, नागरी सुविधा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि समाजकल्याणाचे प्रकल्प या सर्वांचा समावेश असलेल्या कामांमुळे शहराचा विकास वेग घेणार आहे.
प्रभागनिहाय विकासकामांचा तपशील
प्रभाग क्र. १ – ₹६५ लाखांचा निधी -नगर विकास योजनेअंतर्गत यशवंत नगरातील रस्ते व रस्त्यालगतच्या सुधारणा कामासाठी ₹१८ लाख ४५ हजार निधीसह एकूण ₹६५ लाखांचे विविध विकासकामांचे उद्घाटन.प्रभाग क्र. २ – ₹६५ लाखांचे लोकार्पण -नगरविकास योजनेतून मंजूर ₹६५ लाखांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न.प्रभाग क्र. ८ – ₹८२ लाखांची कामे -नगरविकास आणि ‘माझी वसुंधरा’ योजनेतून ₹८२ लाखांच्या निधीतून पूर्ण झालेली व अंतिम टप्प्यातील कामांचे उद्घाटन.प्रभाग क्र. १० – ₹५४ लाखांचा बहुउद्देशीय निधी -स्थानिक विकास निधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना आणि नगर विकास योजनेतून मिळालेल्या ₹५४ लाखांच्या कामांचे उद्घाटन.प्रभाग क्र. १७ – ₹९३ लाख ३० हजार ७८५ रुपये -नगर विकास योजनेसाठी मंजूर या निधीतून पूर्ण झालेल्या रस्ते व नागरी सुविधा कामांचे उद्घाटन.
प्रभाग क्र. १८ – तब्बल ₹१ कोटी ७२ लाख ५२ हजारांचा निधी -
स्थानिक विकास, नगरविकास आणि समाजकल्याण योजनांतर्गत मंजूर झालेल्या ₹१ कोटी ७२ लाख ५२ हजारांच्या भक्कम निधीतून पूर्ण केलेल्या कामांचे उद्घाटन.
या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगलीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने विकासकामे राबवली जात असल्याचे सांगितले. आगामी काळात आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ज्येष्ठ नेते दिलीप तात्या सूर्यवंशी, भाजपा सांगली शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, माजी नगरसेवक सर्जेराव गायकवाड,माजी नगरसेवक प्रशांत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका सोनाली सागरे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, गीतांजलीताई ढोपे-पाटील, माजी नगरसेवक सचिन सावंत, स्नेहलताई सावंत, किशोर भाई शहा भाजपा सांगली शहर जिल्हा सचिव रवींद्र सदामते, भाजपा जिल्हा सदस्य मोहन बापू जाधव, मंडलध्यक्ष राहुल नवलाई, मंडलध्यक्ष कृष्णा राठोड, कुपवाड पूर्व मंडल सरचिटणीस नवनाथ खिलारे, कोमल चव्हाण, सुरज पवार, गीताताई पवार, मकरंद म्हामुलकर, अनारकली कुरणे, रोनक शहा, संग्राम घोरपडे, प्रफुल्ल ठोकळे, समाधान कांबळे, अर्जुन मजले, नीरज मद्रासी, स्वातीताई कोल्हापुरे, जमीर कुरणे, किरण बाबर, हेमलताताई मोरे, आशुतोष कलगुटगी, रामभाऊ चितळे, विक्रमसिंह वाघमोडे, विद्याताई बाबर, मंदार म्हामुलकर योगेश जाधव ऋषिकेश सूर्यवंशी, प्रथमेश गडदे, मायाताई गडदे, अमोल कदम, प्रकाश गायकवाड, नंदकुमार गुरव, सर्जेराव ढेंबरे, सागर सोलनकर, शकील नदाफ, अभिषेक सूर्यवंशी, रणजीत पाटील, महादेव केदार, चंद्रकांत जाधव, धनंजय कुलकर्णी, विकास कुलकर्णी, यशवंत दीक्षित, संदीप पाटील, महिंद्र पाटील, प्रकाश पाटील, महेश निर्मळे, प्रशांत राठोड, सौ.योगिताताई राठोड, सुनील भोसले, वैभव पाटील, सनी धोत्रे, संदीप तुपे, महेश सागरे, प्रसाद वळकुंडे, मारुती पाटील, दीपक वायदंडे, सदाशिव पाटील, बापूसाहेब समलेवाले, सुनील खोत, विजय काटकर,अमित गडदे, अरुणाताई बाबर, शहाजी भोसले, बबन नवलाई, रवींद्र ढगे, सागर बिजरगी, ललित ढबडे, पितांबर शेटे, महावीर कुषाणावर , शीतल पाटील, प्रकाश वाघमोडे, विनायक ऐनापुरे, रोहन दळवी, गणेश पाटील, प्रवीण दळवी,रोहित जगदाळे, शैलेश पवार, राजू नलवडे, अमर पडळकर, शहाजी भोसले, माधुरी वसगडेकर, वैशालीताई पडळकर, महेंद्र सावंत, चंदन सनदी, सागर पवार, समाधान लोंढे, अप्पासाहेब थोरात, संदीप लिंगळे, सौरभ पवार, अनिल गडकरी, सुहास कलघटगी, सुरज पवार, सुमित शिंदे, लियाकत शेख,आदी सर्व भाजपा पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक, माता-भगिनी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.