Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील सदस्यांना झोपेच्या गोळ्या, घरात बॉयफ्रेंडसोबत अनैतिक संबंध; पुण्यातील नामांकित बिझनेसमनच्या घरातील सूनेचा कारनामा

सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील सदस्यांना झोपेच्या गोळ्या, घरात बॉयफ्रेंडसोबत अनैतिक संबंध; पुण्यातील नामांकित बिझनेसमनच्या घरातील सूनेचा कारनामा


पुणे : पुण्यातील एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबाची सुटका डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्या अचूक आणि प्रभावी तपासामुळे झाली आहे. या प्रकरणात आपल्याच लहान सुनेनं आपल्या सासू-सासऱ्यांना आणि कुटुंबातील काही सदस्यांना त्यांना न कळता झोपेच्या गोळ्या देऊन त्रास देत असल्याचं समोर आलं आहे. इतकेच नव्हे, तर ती आपल्या प्रियकरासोबत दिवसा घरात अनैतिक संबंध ठेवत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

शहरातील नावाजलेलं व्यापारी कुटुंब
ज्या कुटुंबासोबत हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे, ते कुटुंब शहरातील नामांकित व्यापारी असून घरात वृद्ध दाम्पत्य, त्यांचे दोन मुलं आणि दोन सुना असा परिवार राहतो. मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा दोघेही त्यांच्या व्यवसायात दिवसभर व्यस्त असत. काही महिन्यांपासून वृद्ध दाम्पत्याला वारंवार झोपेचा त्रास सतवत होता. सुरुवातीला वयामुळे त्रास होत असावा असे वाटून त्यांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली. वृद्ध दाम्पत्याच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे अतिप्रमाण वाढलेलं दिसलं.
अहवालात झोपेच्या गोळ्यांचं प्रमाण

डॉक्टरांनी मोठ्या सुनेची तपासणी केली असता तिच्या अहवालात देखील गोळ्यांचे प्रमाण दिसलं, परंतु लहान सुनेच्या चाचणीमध्ये काहीही आढळलं नाही. त्यानंतर डॉक्टरांना शंका आली, परंतु कुटुंबातील गोपनीयतेमुळे त्यांनी ती गोष्ट कुणाला सांगितली नाही. लहान मुलाच्या शारीरिक व्यंगामुळे त्याचे लग्न जुळण्यात अडचणी येत होत्या. उशिरा का होईना एका मुलीने पसंत केल्याने त्याचं लग्न झालं, त्यामुळे त्याचा संसार सुरळीत व्हावा यासाठी घरातील सर्वजण प्रयत्नशील होते.

दरम्यान, काही दिवसांत घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे छोटे दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. ही घटना आणि झोपेचा त्रास या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने कुटुंबीयांचा संशय नव्या, नुकत्याच लग्न झालेल्या लहान सुनेवर गेला. पण, फक्त संशयाच्या आधारावर दोषी ठरवण्याऐवजी त्यांनी पुरावे जमा करण्याचं ठरवलं.

गुप्तहेर डिटेक्टिव्ह प्रिया काकडेंशी संपर्क
पुरावे मिळत नसल्याने कुटुंबाने सुप्रसिद्ध खासगी गुप्तहेर डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्याशी संपर्क साधला. प्रिया काकडे यांनी सूनेशी मैत्री करत पुरावे गोळा केले आणि काही दिवसांतच खरं ते समोर आलं. लहान सून दररोज सकाळच्या नाष्ट्यामध्ये आपल्या सासू-सासऱ्यांना आणि घरच्यांना झोपेच्या गोळ्या मिसळून देत होती. इतकेच नव्हे, तर ती दिवसाढवळ्या घरात आपल्या प्रियकराला बोलवत आणि दोघांचे अनैतिक संबंध निर्माण होत.

पुरावे पाहून कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी सुनेला समोर बसवून सर्व काही सांगितले असता सुरुवातीला तिने नकार दिला, परंतु पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यावर तिने आपली चूक कबूल केली. घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नातेवाईक आणि समाजातील ज्येष्ठ लोकांची बैठक बोलावून प्रकरणाची सविस्तर चर्चा केली. बैठकीत सुनेचे सर्व कारनामे उघडकीस आले. कुटुंबीयांना परत चोरी गेलेले दागिने आणि पैसे मिळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचा घटस्फोट घेऊन हे प्रकरण संपवलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.