कुरळप : वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी फाटा येथे आज (दि.२२) दुपारी एकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अर्जुन शंकर थोरात (वय 52 ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. थोरात यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूरचे पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोराने गोळीबार करून पलायन केले आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून झाला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. जखमी थोरात यांच्या पोटात व पाठीत गोळ्या लागल्या आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.