दलित महासंघाचे अध्यक्ष कै.उत्तम दादा मोहिते यांच्या शोक सभा मध्ये अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,यामध्ये प्रवक्ते मा. संतोष पाटील म्हणाले की मुंबईनंतर सांगलीमध्ये गुन्हेगारी क्षेत्र वाढले आहे याचे एकमेव कारण आहे पोलीस, एखाद्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार सापडला की पोलीस त्याच्याबरोबर फोटोसेशन करून आपलं स्वतःचं नाव मोठं करतात, याने गुन्हेगारी कमी होत नाही तर उलट वाढतेच.जो गुन्हेगार मर्डर केस मध्ये असतो तो त्याचा गंभीर गुन्हा बघून त्या गुन्हेगाराला पोलिसांनी दयामायां न दाखवता त्याच्या भागातून गाढवावरती बसवून धिंड काढून त्याची दहशत त्या भागातून संपवणे हाच गुन्हेगारी क्षेत्राला वचक बसवणारा पर्याय आहे, परंतु हे न करता त्या गुन्हेगारा बरोबर आपलं नाव कसं मोठं होईल हे पोलीस सध्या बघत आहेत.
परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे तर कै.उत्तम दादा मोहिते यांना ज्या गुन्हेगाराने मारले त्या गुन्हेगारांना त्यांच्या भागातून गाढवावर बसवून धिंड काढावी असे प्रवक्ते संतोष पाटील यांनी सांगितले,यावेळेला दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र सकटे सर, डीपीआयचे अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे सर, मा.सुरेश दुधगावकर, माजी नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे,बहुजन क्रांती दलाचे राम कांबळे सर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा.महेंद्र भाऊ चंडाळे युवा हिंदुस्तान शिवप्रतिष्ठान अध्यक्ष नितीन चौगुले, पारधी हक्क समितीचे अध्यक्ष सुधाकर वायदंडे सर,किरण कांबळे, प्रशांत सदामते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळेला संदीप दादा ठोंबरे,बाजीराव नाईक, लाला वाघमारे, आकाश तिवडे व अनेक नागरिक उपस्थित होते,शेवटी आभार सतीश मोहिते यांनी मांडले सूत्रसंचालन गॅब्ररील तेवढे यांनी केले या वेळेला हजारो नागरिक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.