Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील सर्वात मोठा जमीन घोटाळा, पार्थ पवारांना अडचणीत आणणारी शीतल तेजवानी आहे तरी कोण?

पुण्यातील सर्वात मोठा जमीन घोटाळा, पार्थ पवारांना अडचणीत आणणारी शीतल तेजवानी आहे तरी कोण?


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर १८०० कोटी रुपयांचा जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला अडचणीत आणणाऱ्या शीतल तेजवानीसह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल तेजवानी आणि तिच्या नवऱ्याने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली. पुण्यातल्या मुंढवा येथील हा जमीन घोटाळा समोर आल्यानंतर शीतल तेजवानीने केलेले एक एक कारनामे समोर येत आहे. पार्थ पवार यांना सरकारी जमीन महार वतनाची जमीन म्हणून विकणारी शितल तेजवानी आहे तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत...

शितल तेजवानी पिंपरीची रहिवासी आहे. शीतल तेजवानी आणि त्याचा नवरा सागर सूर्यवंशी यांच्याविरोधातही याआधी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शितल तेजवानीच्याविरोधात गुन्हे दाखल आहे. शितल तेजवानीच्या विरोधात सीआयडी आणि ईडीकरडूनही याआधी कारवाई केली आहे. शितल तेजवानीला सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी अटकही झाली होती. शितल तेजवानीच्या विरोधात याआधीचे शेतकऱ्यांचे फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. आता बावधन पोलिस ठाण्यामध्ये जमीन फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला अडचणीत आणणाऱ्या शीतल तेजवानीचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे. शितल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी या दोघांनी मिळून पिंपरी चिंचवड शहरातील दी सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक मधून जवळपास ४१ कोटी रुपयांचे बनावट कर्ज घेतलं होतं. महागड्या गाड्या आणि लॉन टाकण्याच्या नावावर दी सेवा विकास बँकेच्या वेगवेगळ्या शाखामधून ४१ कोटी रुपयांचं कर्ज शितल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी यांनी घेऊन बँकेची फसवणूक केली होती. या प्रकरणात शितल तेजवानी आणि तिच्या पती सागर सूर्यवंशी या दोघांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून शीतल तेजवानी फरार आहे. बावधन पोलिसांकडून तिचा शोध सुरु आहे. शितलने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे. त्यामुळे बावधन पोलिसांसमोर शितलचा शोध घेण्याचं आव्हान आहे. शीतलच्या अटकेनंतर पार्थ पवारांचा या प्रकरणातील नेमका रोल काय आहे? हे समोर येऊ शकते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.