प्रभाग क्र. १४, सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते लोकार्पण
रु. ४० लाखांच्या निधीतून पूर्ण व पूर्णत्वास जाणाऱ्या कामांचा शुभारंभ
सांगली, दि. २० नोव्हेंबर —प्रभाग क्रमांक १४ मधील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका व नगरविकास योजनेअंतर्गत एकूण ₹४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अनुषंगाने पूर्ण झालेल्या तसेच पूर्णत्वास जाणाऱ्या कामांचे लोकार्पण आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
मंजूर विकासकामांमध्ये खालील कामांचा समावेश :
1️⃣ एस.टी. स्टॅण्ड ते गरवारे कॉलेज मार्गाचे रस्ता निर्मितीकार्य
— निधी : ₹16,14,000
2️⃣ मारुती चौक येथे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सी.डी. वर्क
— निधी : ₹11,60,000
3️⃣ विवेकानंद मंडळ – सतीश पवार घर – खाली सरकारी घाट रस्ता विकास
तसेच गावभाग, जोशी गल्ली रस्ता सुधारणा
— निधी : ₹12,04,000
या कामांमुळे प्रभागातील वाहतूक सुलभता, पावसाळ्यातील निचरा व्यवस्था सुधारणा, तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असल्याचे प्रतिपादन या वेळी करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश (तात्या) बिरजे, माजी नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक सुबराव मद्रासी, युवराज बावडेकर, रणजीत सावर्डेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडिलकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय साळुंखे, जिल्हा सरचिटणीस स्मिता भाटकर, जिल्हा सचिव उदय मुळे, मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शांतिनाथ कर्वे, जैन प्रकोष्ठचे प्रशांत गौंडाजे, उद्योग आघाडीचे शरद नलवडे, संदीप कुकडे, माधुरी वसगडेकर, स्मिता पवार, मनीषा कुकडे, सुलभा जोशी, मोहन जामदार, नितीनकाका शिंदे, सौ. आशा शिंदे, प्रथमेश वैद्य, शुभम चव्हाण, अनिकेत खिलारे, प्रताप बिरजे, गजानन नलावडे, स्नेहजा जगताप यांसह सर्व भाजपा पदाधिकारी, सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.