Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यास महापालिकेत भटकी कुत्री सोडणार ! -माजी आमदार नितीन शिंदे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यास महापालिकेत भटकी कुत्री सोडणार ! -माजी आमदार नितीन शिंदे


सांगली महापालिका क्षेत्रामध्ये भटकी कुत्री आणि जनावरे यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सहस्रोंच्या संख्येने असणारी भटकी कुत्री वृद्ध महिला, वाहनचालक आणि बालक यांच्यावर आक्रमणे करत आहेत.

काहींना या आक्रमणात प्राणही गमवावा लागला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने भटकी कुत्री सार्वजनिक ठिकाणांहून त्वरित हटवण्याचा आदेश दिला आहे. महापालिकेने या आदेशाची कार्यवाही करावी, अन्यथा महापालिकेच्या आवारात आणून भटकी कुत्री सोडण्यात येतील, अशी चेतावणी 'हिंदु एकता आंदोलना'चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे आणि माजी नगरसेविका अधिवक्ता सौ. स्वाती शिंदे यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी दिली.

l
श्री. नितीन शिंदे म्हणाले की,

१. संपूर्ण महापालिका क्षेत्रात ही भटकी कुत्री घाण आणि वाहनांची हानी करत आहेत. या विरोधामध्ये काही महिन्यांपूर्वी हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांना भेटून निवेदन दिले होते.

२. भटक्या कुत्र्यांना पकडून महापालिकेच्या वतीने त्वरित 'निवारा केंद्र' बांधून त्यामध्ये त्यांना ठेवण्याची मागणी केली होती.

३. यावर महापालिकेच्या आयुक्तांनी 'समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोजवळ असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर 'निवारा केंद्र' बांधून कुत्र्यांना पकडून त्या निवारा केंद्रामध्ये बंदीस्त करून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावू', असा शब्द दिला होता. त्याचे पुढे काय झाले ?

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.