क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात
सांगली दि.२८ नोव्हेंबर : स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा प्रसार करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुप्षहार अर्पण करून सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार गाडगीळ यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीकारक योगदानावर प्रकाश टाकला. “फुले दांपत्याने शिक्षणाद्वारे समाजाला दिलेला दिशा-निर्देश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. समाजातील वंचित, शोषित घटकांना उभारी देण्याचे त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरते,” असे मत त्यांनी व्यक्त केले. महात्मा फुले यांच्या सामाजिक सुधारणा, सत्यशोधक चळवळ, स्त्री-शिक्षणास दिलेले प्राधान्य आणि जातिभेद निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. सामाजिक ऐक्य आणि प्रगतिच्या भावना दृढ करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, स्मिता भाटकर, जिल्हा सचिव रवींद्र सदामते, भाजपा जिल्हा सदस्य दीपक कर्वे, भाजपा अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष सुजित काटे, मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, तसेच कुपवाड पूर्व मंडल सरचिटणीस नवनाथ खिलारे, सुजित राऊत, शुभम देसाई, गौस पठाण, शैलजा कोळी, माधुरी वसगडेकर, अश्विनी तारळेकर, स्वाती कोल्हापुरे, सचिन परांजपे आदी मान्यवर,पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व पदाधिकारी,शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेतर्फे सातत्याने उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.