झी २४ तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंढवा भागातील जमीन अमेडीया कंपनीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता. तशी माहिती समोर आली आहे. तहसीलदार येवलेने 40 एकर वतनाची जागा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून परत मिळवण्याबाबत प्रयत्न केला होता अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
40 एकर वतनाची जागा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून परत मिळवण्यासाठी येवलेने अनेक प्रयत्न केले. वतनदार भोगवटा भरण्यास तयार असल्याने त्यांना ती जागा परत देण्यात येत आहे असे पत्र जून महिन्यात बॉटिनीकल सर्वे ऑफ इंडिया या स़ंस्थेला दिले आणि ही जागा तात्काळ रिकामी करण्यास सांगितले होते. हे गोपनीय पञच झी 24 तासच्या हाती लागले आहे.
पत्रात येवलेने जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरे पत्र लिहीले आणि ही जागा मूळ वतदनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले. वतनदारांची पॉवर ऑफ एटर्नी शीतल तेजवानीकडे असल्याने आणि शितल तेजवानीने ही जागा 300 कोटींना अमेडीया कंपनीला विकली असल्याने ही जागा अमेडीया कंपनीला देण्याचे आदेश दिले. त्यामुळे तहसीलदार येवलेला हाताशी धरून ही जमीन बळकावण्याचे प्रयत्न अनेक महिन्यांपासुन सुरु होते हे दिसून येत आहे.
मुंढवा आणि बोपोडी जमीन प्रकरणात अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे यापूर्वीचे निर्णय व आदेशांची तपासणी केली जाणार आहे.. यात काही संशयास्पद आढळल्यास त्यानुसारही कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान, येवले यांच्या सर्व आदेशांबाबत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.महाविद्यालयाच्या मालकीची सुमारे 13 एकर जमीन कुळांच्या नावे करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्याची शिफारस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गेल्या महिन्यातच राज्य सरकारकडे केली होती. येवले यांनी याबाबत दिलेले आदेश प्रांताधिकारी सुनील जोशी यांनी रद्दबातल करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केलेली आहे.दरम्यान, बोपोडी जमीन हडप गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेलाय...त्यामुळे या प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचीही सखोल चौकशीही होणार आहे या निलंबित तहसीलदारांनी मुंढवा भूखंडाचा बेकायदा ताबा मिळवून देण्यासाठी बॉटनिकल सर्वे इंडिया संस्थेला ती जमीन हस्तांतरित करण्याचे लेखी आदेश दिले होते, याचीही चौकशी केली जाणार हे...यावरून शितल तेजवाणीने या शासकीय भूखंडावर याआधीही बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.