सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगलीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांना नुकतेच 'नवराष्ट्र को ऑपरेटीव्ह अवार्ड २०२५' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार गेली अनेक दशके सहकार, समाज आणि पत्रकारिता क्षेत्रात अग्रक्रमाने कार्यरत असलेल्या नवभारत वृत्त समुहाच्या दैनिक नवराष्ट्र तर्फे मुंबई स्थित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे समारंभपुर्वक देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. विविध सहकारी संस्थामध्ये मार्गदर्शक काम केल्याबद्दल हा को ऑपरेटीव्ह आयकॉन सन्मान त्यांना लाभला. त्याबद्दल श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा कर्मवीर पतसंस्थेच्यावतीने चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे व व्हाईस चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शॉल देवून सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना श्री. रावसाहेब पाटील म्हणाले कि, या सोहळयाच्या निमित्ताने मी सहकारी क्षेत्रात काम करीत असताना येणाऱ्या समस्या राज्याचे सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील, वस्त्रोद्योग मंत्री. ना. संजय सावकारे, मंत्री विनय कोरे, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राज्याचे सहकार व पणन सचिव प्रवीण दराडे याच्या समोर मांडल्या. नविन येणारे नियम हे सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक व्हावेत आडचनीचे असू नयेत अशी विनंती त्यांना केली. त्यास मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच कर्मवीर पतसंस्थेच्या प्रगतीबाबत मान्यवरांनी कौतुकास्पद उद्गार काढल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी सत्कारावेळी संस्थेचे संचालक डॉ. अशोक आण्णा सकळे, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, श्री. ओ.के. चौगुले (नाना) डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम व सेवक वर्ग उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.