तुमचा मोबाईल चार्जर प्लगमध्ये खोचलेला आहे, पण फोन जोडलेला नाही? टीव्ही बंद आहे, तरी स्विच ऑन? ही छोटीशी सवय तुमच्या विजेच्या बिलात व्हॅम्पायरसारखी चोरी करतेय.. 'व्हॅम्पायर एनर्जी लॉस' किंवा 'स्टँडबाय पॉवर' नावाचा हा सिक्रेट शत्रू घरातील उपकरणे बंद असतानाही वीज खातो. X (पूर्वीचे ट्विटर) वर ३ नोव्हेंबरपासून हा विषय ट्रेंडिंग ठरलाय जेव्हा एका युजरने चार्जरचा फोटो शेअर करत विचारले, "यात वीज वाया जातेय का?" Grok AI ने उत्तर दिले: "हो! ०.१ ते ०.५ वॅट स्टँडबाय पॉवर खेचतो, त्यामुळ लगेच अनप्लग करा!"
काय आहे 'व्हॅम्पायर एनर्जी'?
इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद किंवा स्टँडबाय मोडमध्ये असतानाही प्लगमध्ये राहिल्यास वीज वापरतात. याला 'फॅंटम लोड' किंवा 'व्हॅम्पायर पॉवर' म्हणतात. स्टॅनफर्डच्या चाचण्यांनुसार फोन न जोडलेला चार्जर ०.२६ वॅट वीज खातो.. टीव्ही, केबल बॉक्स, राउटर, प्रिंटर, गेम कन्सोल, इलेक्ट्रिक घड्याळे हे मुख्य दोषी आहेत बर का. लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीच्या अहवालात म्हटले आहे, घरगुती विजेच्या ५ ते १० टक्के भाग हा व्हॅम्पायर एनर्जीचा असतो. अमेरिकेत सरासरी कुटुंबाला वर्षाला ७० ते २२० डॉलर (सुमारे ५,८०० ते १८,००० रुपये) फुकट द्यावे लागतात. जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या १ टक्के कारणही हेच आहे. X वर चर्चेची ठिणगी पडली आणि पोस्टना उधाण आले. युजरच्या फोटोवर Grok म्हणाला, वीज वाया जातेय. अनप्लग केल्यास बचत होईल.. यामुळे हजारो नेटिझन्सनी प्रश्न विचारले. आधुनिक उपकरणे सोयीस्कर असली, तरी स्टँडबाय मोडमध्ये वीज खेचत राहतात. डिव्हाइस लवकर चालू व्हावे म्हणून सहन करायचे
यामुळे किती नुकसान होते?
एक चार्जर: ०.१-५ वॅट (वार्षिक १-२ युनिट)
घरातील १० उपकरणे: ५०-१०० वॅट (महिन्याला ५-१० युनिट अतिरिक्त)
परिणामी बिलात ५-१०% वाढ, पर्यावरणावर भार वाढतो
हे कसे थांबवावे?
१. अनप्लग करा: वापरानंतर उपकरणे काढून टाका.२. पॉवर स्ट्रिप्स: एकाच स्विचने सर्व बंद करा३. स्मार्ट प्लग्स: अॅपद्वारे नियंत्रण ठेवा.४. स्क्रीन सेव्हर बंद: लॅपटॉप-डेस्कटॉपवर डिस्प्ले मिनिमाइझ करा.५. डिजिटल डिस्प्ले कमी ठेवा: अनावश्यक लाईट्स ऑफ करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.