Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे नेते गद्दार, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रातील सफाई होईल; जैन मुनी निलेश चंद्र काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे नेते गद्दार, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रातील सफाई होईल; जैन मुनी निलेश चंद्र काय म्हणाले?


मुंबई : जैन समाज हा सनातनी हिंदू समाजाचा एक भाग आहे, पण निवडणुका आल्या की मराठीचा मुद्दा येतो, कबुतरांचा मुद्दा येतो. जैन समाजाची मंदिरं पाडली जातात, त्यामुळे वेळ आली की आम्ही शस्त्र हाती घेऊ असा पुनरुच्चार जैन मुनी निलेश चंद्र  यांनी केला. 
(योगी आदित्यनाथ) यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, सगळी सफाई होईल असंही जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले. ते एबीपी माझाच्या महा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. दादरचा कबुतरखान्याचा वाद आणि त्या संबंधित प्रश्नांवर जैन मुनी निलेश चंद्र यांनी सविस्तर उत्तर दिलं. जैन हा प्राचीन धर्म आहे, शांतताप्रिय आहे. निवडणूक आल्यावर मात्र मराठी-जैन मारवाडी असा वाद निर्माण केला जातो असा आरोप निलेश चंद्र यांनी केला.



गद्दार नेत्याला सोडणार नाही

जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले की, "जैन समाज हा हजारो वर्षे प्राचीन धर्म आहे. कुणाची मंदिरं किंवा घरे पाडून जैन समाजाने जैनालय बांधलं नाही. हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे. पण आमचे विलेपार्लेचे मंदिर बुलडोझरने पाडलं, मग अवैध मशिदी पाडल्या का? दोन नेते मला भेटायले आहे, 15 दिवसांनी आम्ही तोडगा काढतो म्हणाले, पण तो निघाला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे जे गद्दार नेते आहेत, जे समाजाला तोडत आहेत त्यांची खैर नाही. माझे प्राण गेले तरी चालतील, पण त्यांना मी सोडणार नाही." देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा जो संदेश दिला तो मी दिला आहे. जो हिंदी हिताची गोष्ट करेल, त्याला आम्ही समर्थन देऊ असं निलेश चंद्र म्हणाले.


तुम्ही फक्त मारवाडी समूदायाच्या विरोधात
दादरच्या कबुतरखान्याविरोधात आक्रमक झालेल्या मनसे नेत्यांना आणि ठाकरे बंधूंनाही जैन मुनी निलेश यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "तुम्हाला जर मराठीबद्दल प्रेम असेल तर तुम्ही भेंडी बाजारमध्ये जा, मुस्लिम परिसरात जा आणि बघा. मुंब्र्यात एका वर्षात शंभर कबरी उभ्या झाल्या, बांग्लादेशी तिकडे राहतात, त्याची तुम्हाला चिंता नाही. तुम्ही फक्त मारवाडी समूदायाच्या विरोधात बोलता."

प्रत्येक समाजाचा पक्ष आहे, पण जैन समाजाचा वेगळा पक्ष नाही. आमच्या समाजाच्या प्रश्नांवर आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं. त्यामुळे आम्हीही आमचा पक्ष स्थापन करू असं निलेश चंद्र म्हणाले. हे राजकीय लोक आहेत ते जाती आणि भाषेच्या नावावर भेदभाव करतात. निवडणुका आल्यावर या गोष्टी होतात. महापालिका निवडणूक झाल्यावर हे सगळे शांत बसतील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.