Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- वाळवा रस्त्याची दुरावस्था; सरपंच कांबळे यांचे खड्ड्यात झोपून आंदोलन!

सांगली :- वाळवा रस्त्याची दुरावस्था; सरपंच कांबळे यांचे खड्ड्यात झोपून आंदोलन!


हुतात्मा चौक ते चांदोली वसाहत; रस्त्याची वाईट स्थिती वाळवा : वाळवा-ईश्वरपूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अनेक अपघात घडत असताना संबंधीत विभाग दुर्लक्ष करीत असल्याने सरपंच संदेश कांबळे यांनी वाळवा इस्लामपूर मार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यात झोपुन आंदोलन केले.

सरपंचांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले. हुतात्मा चौक आणि परिसरात ग्रामपंचायतकडे जाणारा रस्ता, हुतात्मा हायस्कूल ते चांदोली वसाहत, व गावातील सर्वच रस्ते खराब आहेत. याचे पॅचवर्क व डांबरीकरणाचे काम कधी होणार? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ सुद्धा विचारू लागले आहेत. याबाबत सरपंच कांबळे म्हणाले, अनेकवेळा मागणी करून सुद्धा रस्त्याचे काम होत नाही. या अनोख्या आंदोलनाची परिसरामध्ये चर्चा आहे. भविष्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे डोळे नाही उघडल्यास वाळवेकर रस्त्यावर उतरतील.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.