जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत हरियाणाच्या हरीदाबाद येथील एका मेडिकल कॉलेजमधून ३०० किलो RDX, दोन AK47 आणि मोठ्या दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
डॉ. आदिल राठरने दिलेल्या इनपूटनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. आदिल राठरला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याच्या साथीदार मुजमीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी पोलिसांना अनंतनाग येथील त्याच्या खोलीत एके ४७ आढळून आली होती. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, हरियाणाच्या मेडिकल कॉलेजच्या खोलीत दारुगोळा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत हरियाण्याच्या फरिदाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात छापा टाकला. यावेळी डॉक्टर मुजमीलच्या खोलीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स, दारुगोळा आणि दोन एके ४७ आढळून आला. पोलिसांनी ही स्पोटकं ताब्यात घेतली आहेत. याद्वारे देशात मोठा घातपात करण्याचा प्रयत्न होता का, याचा तपासही पोलिसांनी सुरु केला आहे.याशिवाय दोघे डॉक्टर कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. तसेच याप्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, त्याचं नेटवर्क कुठं आहे. याचा तपासही पोलीस करत आहेत. श्रीनगर आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. हे दोघे डॉक्टर जैश-ए-मोहम्मद किंवा गजवत-उल-हिंद या संघटनांशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.