Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मला माफ करा, मी पैसे द्यायला विसरले"! हात जोडत भारतीय तरुणीने अमेरिकन पोलिसांसमोर केली विनवणी; नक्की काय घडलं? Video Viral

"मला माफ करा, मी पैसे द्यायला विसरले"! हात जोडत भारतीय तरुणीने अमेरिकन पोलिसांसमोर केली विनवणी; नक्की काय घडलं? Video Viral


अलिकडेच सोशल मिडियावर एका धक्कादायक व्हिडिओने खळबळ माजवली आहे, ज्याला पाहून भारतीयांना धक्का बसला आहे. व्हिडिओ अमेरिकेतील असून यात एक भारतीय महिला पोलिसांसमोर हात जोडून विनवणी करताना दिसून आली. व्हिडिओमध्ये, ती महिला हात जोडून वारंवार म्हणत असल्याचे दिसून येते की, "सर मी पैसे द्यायला विसरले, मला माफ करा". तरुणीची अशी अवस्था का झाली आणि नक्की तिने कोणता गुन्हा केला ते चला जाणून घेऊया. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरलहोत असून तरुणीच्या कृत्यावर भारतीय फार नाराज झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

सदर व्हिडिओ हा अमेरिकेतील एका सुपरमार्केटमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये पोलिस महिलेला अटक करण्याचा प्रयत्न करत असतात आणि महिला वारंवार विनवणी करत असते. पोलिस अधिकारी म्हणतो, "मागे वळा, आम्ही तुम्हाला हातकडी लावू." हे ऐकून, महिला घाबरते आणि हात जोडून विनवणी करू लागते. ती वारंवार म्हणते की ती फक्त "पेमेंट करायला विसरली", परंतु पोलिसांना तिच्या स्पष्टीकरणावर विश्वास बसत नाही. ती महिला विचारते, "मी माझ्या पतीला फोन करू का?" अधिकारी कठोरपणे म्हणतो, "नाही, आधी प्रक्रिया पूर्ण होईल." सोशल मीडियावरील लोक हे दृश्य पाहून हैराण झाले आहेत. काही जण याला "इमोशनल ब्लॅकमेल" म्हणत आहेत, तर काही जण भारतीयांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
या व्हिडिओने ऑनलाइन लोकांचे लक्ष वेधले आहे आणि जगभरातील लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी महिलेच्या वर्तनावर टीका केली आहे तर काहींनी तरुणीच्या कृत्यामुळे भारतीयांची प्रतिमा बाहेरदेशी भंग केल्याचे म्हटले आहे. या घटनेचा व्हिडिओ @kiddaannews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्मवर याला शेअर करण्यात आले असून हा व्हिडिओ इंटरनेटवरील एक चर्चित व्हिडिओ बनला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, "हे हृदयद्रावक आहे" तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "तिच्या शिक्षणासाठी तिच्या पालकांनी कर्ज घेतले असावे हे दुःखद आहे" आणखीन एका युजरने लिहिले आहे, "हे लज्जास्पद आहे आणि तिला कायद्याने सर्वोच्च शिक्षा झाली पाहिजे".


टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.