मुंबई : कोल्डड्रिंक्समध्ये गोळ्या मिसळून अनेक मुलींवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना मुंबईमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 45 वर्षांच्या आरोपीला 6 तासांमध्ये अटक केली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महेश रमेश पवार असे या आरोपीचे नाव आहे.
मुंबईच्या उपनगरातील विरार येथून महेश पवारला अटक करण्यात आली. आरोपीने अल्पवयीन मुलींना कोल्डड्रिंक्समधून गुंगीचं औषध दिलं, त्यामुळे मुली बेशुद्ध झाल्या. बेशुद्ध अवस्थेमध्येच त्याने मुलींवर अत्याचार केला आणि याचे व्हिडिओ काढले. मुली शुद्धीमध्ये आल्यानंतर त्याने हे व्हिडिओ त्यांना दाखवले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या व्हिडिओंचा वापर पीडित मुलींना वारंवार ब्लॅकमेल करण्यासाठी आणि लैंगिक शोषण करण्यासाठी केला जायचा. आरोपीने आतापर्यंत आठ ते दहा अल्पवयीन मुलींना लक्ष्य केल्याचा संशय आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.