Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय जनता पार्टीतर्फे सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

भारतीय जनता पार्टीतर्फे सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न


सांगली, दि. 14 डिसेंबर : भारतीय जनता पार्टीतर्फे सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 13 व 14 डिसेंबर 2025 रोजी पाटीदार भवन, सांगली येथे घेण्यात आल्या. सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून तब्बल 570 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपा निवडणूक समितीकडून 13 व 14 डिसेंबर असे दोन दिवस चाललेल्या शिस्तबद्ध प्रक्रियेत घेण्यात आल्या.

या मुलाखती संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, निवडणूक प्रभारी व मिरज विधानसभा आमदार सुरेश भाऊ खाडे, प्रदेश उपाध्यक्ष व निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील,जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या उपस्थितीत पार पडल्या. सर्व इच्छुक उमेदवारांनी समितीसमोर आपली मते व भूमिका मांडली. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, विशाल पवार, धनंजय कुलकर्णी, स्मिता भाटकर, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, विजय साळुंखे, मंडल अध्यक्ष अभिजीत गौराजे, जिल्हा संवादक अक्षय काळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.