महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं! 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात, 15 जानेवारीला मतदान, 16 तारखेला निकाल?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येणार असून 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचा कालावधी 23 - 30 डिसेंबर 2025छाननी 31 डिसेंबर 2025उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी 3 जानेवारी 2026मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026एकूण 29 महानगरपालिका निवडणूक जाहीरएकूण 2869 जागांसाठी निवडणूकमहिला - 1442अनुसुचित जाती - 341अनुसुचित जमाती - 77नागरिकांचा मागास प्रवर्ग - 759
राज्यातील महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकां जाहीर झाल्या आहेत. यात मुदत संपलेल्या 27 महानगर पालिकांचा समावेश आहे, तर जालना आणि इचलकरंची या दोन नवनिर्मित महानगर पालिका आहेत. मुंबई महानगर पालिकेत 1 सदस्यीय प्रभाग आहे, प्रत्येक मतदाराला एक मत द्यावे लागेल. इतर महानगर पालिकांमध्ये एका प्रभागातून तीन ते पाच उमेदवार निवडून द्यावे लागतील. त्यामुळे मतदारांना तीन ते पाच मतदान करावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील
मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हापरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी त्या देखील 31 जानेवारीच्या आधी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.