Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

AI च्या जोरावर उजळणार तुमच्या मुलाचे भविष्य! 'हे' ५ कोर्सेस देतील लाखो-करोडोंचे पॅकेज; आजच करा तयारी

AI च्या जोरावर उजळणार तुमच्या मुलाचे भविष्य! 'हे' ५ कोर्सेस देतील लाखो-करोडोंचे पॅकेज; आजच करा तयारी


सध्याच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असून प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) चा बोलबाला वाढत आहे. शाळा, कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत आता एआयचा वापर अनिवार्य होत आहे. जर तुमच्या पाल्याने नुकतीच १२ वी उत्तीर्ण केली असेल आणि त्याला भविष्यात मोठ्या पगाराची नोकरी मिळवून द्यायची असेल, तर AI मधील करिअर हा सर्वोत्तम पर्याय आहे. खालील ५ कोर्सेस तुमच्या मुलाला भविष्यातील 'सुपर सॅलरी' मिळवून देण्यासाठी गेमचेंजर ठरू शकतात:

१. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये डिप्लोमा (Diploma in AI)

ज्यांना कमी वेळेत एआय शिकायचे आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात पायथन प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग आणि डेटा प्रोसेसिंगचे बेसिक ज्ञान दिले जाते.

कालावधी: ६ महिने ते २ वर्षे.
फी: ५० हजार ते ३ लाख रुपये.
संधी: एआय टूल हँडलर, बेसिक प्रोग्रामर.

२. बी.टेक इन AI आणि डेटा सायन्स (B.Tech in AI & Data Science)

जर मुलाने १२ वी सायन्स शाखेतून पूर्ण केली असेल, तर हा ४ वर्षांचा इंजिनिअरिंग कोर्स त्याला थेट एआय एक्सपर्ट बनवू शकतो. यात क्लाउड कॉम्प्युटिंग, बिग डेटा आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस (R, Python, C++) शिकवल्या जातात.

फी: सरकारी कॉलेजमध्ये ७५ हजार ते १.५ लाख (वार्षिक), खाजगी मध्ये १.५ ते ४ लाख रुपये.
संधी: डेटा सायंटिस्ट, एआय तज्ज्ञ (हेल्थ आणि फायनान्स सेक्टर).

३. बी.सी.ए. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (BCA in AI)

फक्त सायन्सच नाही तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीही हा कोर्स उपलब्ध आहे. यात कॉम्प्युटर ॲप्लिकेशनसह एआय आणि डीप लर्निंगचे प्रगत तंत्र शिकवले जाते.

फी: ५० हजार ते ३ लाख रुपये (वार्षिक).
संधी: एआय इंजिनिअर, डेटा ॲनालिस्ट.

४. बीएससी एआय आणि डेटा सायन्स (B.Sc in AI & Data Science)

हा ३ वर्षांचा पदवी कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये रुची आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स फायदेशीर आहे. यात सांख्यिकी (Statistics) आणि डेटा मायनिंगवर भर दिला जातो.

फी: ३० हजार ते ३ लाख रुपये (वार्षिक).
संधी: ई-कॉमर्स आणि आयटी क्षेत्रात डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरी.

५. रोबोटिक्स आणि एआय डिप्लोमा (Diploma in Robotics & AI)

ज्या मुलांना सॉफ्टवेअरपेक्षा हार्डवेअर आणि मशीनमध्ये रस आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स बेस्ट आहे. यात रोबोट बनवणे, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि मशीनरीचे प्रॅक्टिकल ज्ञान दिले जाते.

फी: ४० हजार ते ३ लाख रुपये.
संधी: मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक कंपन्यांमध्ये मोठी संधी.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.