Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! जेजुरीत मतमोजणीनंतर रक्ताचा सडा! जेजुरी गडावर राष्ट्रवादीच्या विजयी मिरवणुकीत मोठी दुर्घटना; 2 नवनिर्वाचित नगरसेविकांसह 16 जण गंभीर जखमी

Big Breaking! जेजुरीत मतमोजणीनंतर रक्ताचा सडा! जेजुरी गडावर राष्ट्रवादीच्या विजयी मिरवणुकीत मोठी दुर्घटना; 2 नवनिर्वाचित नगरसेविकांसह 16 जण गंभीर जखमी


पुणे: जेजुरीत मतमोजणी पार  पडल्यानंतर निकाल जाहीर होताच एक दुर्दैवी घटना घडली. खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडारा  अर्पण करत असताना भंडाऱ्याला अचानक आग लागली आणि मोठा भडका उडाला. या घटनेत सुमारे 16 जण गंभीररीत्या भाजले असून त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. ही घटना दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. 

या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मोनिका राहुल घाडगे, त्यांचे पती राहुल घाडगे तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. स्वरूपा जालिंदर खोमणे यांचा समावेश आहे. घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने जेजुरी येथील खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. 
मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते खंडोबा गडावर दर्शनासाठी गेले होते. गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करताना कार्यकर्त्यांनी उधळलेला भंडारा अचानक पेटला आणि त्यात स्फोट झाला. या आगीत रुपाली खोमणे, विलास बारभाई, सानिका गाढवे, संस्कार गलांगे, देवल बारभाई, मनीषा चव्हाण, रजनी बारभाई, स्वप्नील लाखे, अनिल बारभाई, गणेश चव्हाण, निशा दादा भालेराव, लक्ष्मी माऊली खोमणे, मोनिका राहुल घाडगे, राहुल कृष्णा घाडगे, कु. स्वरूपा जालिंदर खोमणे आणि उमेश भंडलकर हे जखमी झाले आहेत.
या घटनेबाबत बोलताना जयदीप बारभाई यांनी सांगितले की, गडाच्या पहिल्या पायरीजवळ घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भेसळयुक्त आणि ज्वालाग्राही भंडाऱ्यामुळे हा भडका उडाल्याची शक्यता आहे. भविष्यात अशा भंडाऱ्यांच्या विक्रीवर कडक कारवाई केली जाईल आणि नगरपालिका याबाबत कठोर पावले उचलणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.