महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या अनेक तऱ्हा युत्या आणि आघाडी करत आहेत. कुठे महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात तर कुठे एकत्र आहेत. तर कुठे राज्यातील विरोधी पक्षातील एका पक्षाशीच सत्ताधारी पक्षांनी युती केल्याचं दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाट्यमय घडामोडी घडू लागल्या आहेत.
या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. आधी ही चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता स्वत: अजित पवार यांनीची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली आहे.पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केलीय. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिलंय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी अजित पवार गटासोबत तीन गुप्त बैठका केल्या. अखेर या बैठकांना आता मूर्तरूप आल्याचं दिसून येतंय. उद्याच या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर होऊ शकते.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे मिशन १२५
पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेत भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. भाजपने मिशन १२५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय. भाजपकडून 'अबकी बार १२५ पार' नारा दिला जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विरोधकांच्या फक्त तीन जागा निवडून येतील, असे भाजपकडून सांगितलंय. त्यावरुन, राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली. भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास आणि घमंड नडेल. अशी टीका करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.