माणुसकीने फक्त ४ दिवस द्या...; अटक टाळण्यासाठी कोकाटेंनी केली 'आजार'पणाची ढाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
नाशिक : सभागृहात रम्मी खेळल्यामुळे कृषी खाते गमवावे लागलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, कोकाटे सध्या शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना शरण येण्यासाठी चार दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
कोकाटे यांना शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. आज ते आजारी असल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी केला, मात्र कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्यात आले नाही. यामुळे न्यायालयाने ही सबब फेटाळत कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. नाशिक जिल्हा प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायमूर्ती रुपाली नरवडीया यांनी हे आदेश दिले आहेत.नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात मंत्री कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चारजणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी या प्रकरणात नाशिक न्यायालयाने मंत्री कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.