Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टरने तू म्हणताच पेशंट संतापला. खाटेवरून उठून डॉक्टरला बेदम चोपले; अख्खं रुग्णालय हादरले

डॉक्टरने तू म्हणताच पेशंट संतापला. खाटेवरून उठून डॉक्टरला बेदम चोपले; अख्खं रुग्णालय हादरले


हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मोठा राडा झाला आहे. पेशंटकडून एका डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. रिकाम्या पलंगावर आराम करणाऱ्या रुग्णाला डॉक्टरने ‘तू’ म्हणून बोलल्यावरून झालेल्या वादातून दोघांमध्ये वॉर्डमध्येच हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी करत रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र निदर्शने केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एंडोस्कोपीसाठी करण्यासाठी पेशंट रुग्णालयात

समोर आलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. अर्जुन पानवर हे रुग्णालयात एंडोस्कोपीसाठी गेले होते. 11 वाजता एंडोस्कोपी झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये आराम करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे ते सोबत आलेल्या नातेवाईकासह छातीच्या ओपीडीच्या वॉर्डमध्ये गेले आणि तेथे एक रिकामा बेड पाहून तेथे झोपले.

डॉक्टरची पेशंटला मारहाण
अर्जुन पानवर एक डॉक्टर तेथे आले आणि त्यांनी पंवार यांना ‘तू इथे कसा आला?’ असा एकेरी उल्लेख करत चिडून बोलायला लागले. पंवार यांनी त्यांना एंडोस्कोपी झाल्याची माहिती दिली, मात्र त्या डॉक्टरने उद्धटपणे बोलणे सुरूच ठेवले. एकेरी भाषेत बोलू नको, असे पानवर यांनी म्हणताच डॉक्टरने त्यांना मारहाण करण्यास सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र निदर्शने केली, त्यामुळे डॉ. राघव नरुला यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, या घटनेनंतर डॉक्टर राघव नरुला यांना निंलबित करण्यात आले आहे. मात्र आयजीएमसीच्या रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने डॉक्टरच्या समर्थनार्थ बाहेर पडून रुग्णावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. शिमला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सोहेल शर्मा यांनी सांगितले की, ‘घडलेल्या घटनेपासून आरोपी डॉक्टर तणावाखाली आहे, कारण त्याच्यावरील आरोप निराधार आहेत. डॉक्टरने रुग्णासोबत गैरवर्तन केले नाही, तर रुग्णाने गैरवर्तन केले आणि त्याच्यावर हल्ला केला. डॉक्टरबर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.’

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.