Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिका तिजोरीस निवडणूक पावली, 'इतक्या' कोटीची थकबाकी वसूल झाली

सांगली महापालिका तिजोरीस निवडणूक पावली, 'इतक्या' कोटीची थकबाकी वसूल झाली


सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची ना हरकत दाखल्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. आतापर्यंत ५५० हून अधिक जणांनी महापालिकेकडे ना हरकतसाठी अर्ज केले आहेत. त्यात उमेदवारासह सूचक व अनुमोदकही थकबाकीदार नसावा, असे बंधन असल्याने अनेकांनी सूचक, अनुमोदकांचीही थकबाकी भरली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत एक कोटीची भर पडली आहे. या निवडणुकीत सुमारे दोन कोटींची थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे.

महापालिकेची निवडणूक लढविणारा उमेदवार हा त्या संस्थेचा थकबाकीदार नसावा, अशी अट राज्य निवडणूक आयोगाने घातली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व त्याला सूचक-अनुमोदक असणाऱ्यांना महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता करासह इतर सर्व कर पूर्ण भरणे आवश्यक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी थकबाकी भरण्यास सुरूवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून महापालिकेत थकबाकी भरून एनओसी घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली आहे. त्यासाठी उमेदवार आपली व सूचक-अनुमोदकाची थकबाकी भरून देणे नसल्याचा दाखला घेत आहेत. 

त्यामुळे गेल्या चार दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटी रुपये जमा झाले आहेत. घरपट्टी विभागाची सुमारे १ कोटीची थकबाकी वसूल झाली आहे, तर पाणीपट्टी विभागाचे ३ ते ४ लाख वसूल झाले आहे. अर्ज भरण्यासाठी मंगळवार २३ पासून सुरुवात झाली असून, दि. २७ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत आहे. या मुदतीत दोन कोटींची थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.