मिरजेत लूटमार; टोळी जेरबंद चौघांनी जबरदस्तीने ८ हजार लुटले संशयितांकडून सव्वादोन लाखाची वाहने जप्त:, महात्मा गांधी पोलीस चौक यांची कारवाई
मिरज : खासगी फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्याचे सांगत जबरदस्तीने ८ हजार रुपये लुटणाऱ्या चौघांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विपुल किशोर भोरे (वय २५, रा. स्फूर्ती चौक, सांगली), अलोक परशुराम वायदंडे (१९, रा. तानंग, ता. मिरज), मयुरेश दीपक मोटे (२०, रा. संजयनगर, सांगली) आणि राजू मनीष परिहार (३०, रा. सर्वोदय पार्किंग यार्ड, मिरज) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सव्वादोन लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
फिर्यादी शीतलकुमार माने हे दि. २१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथून मिरजेतील शासकीय रुग्णालयात बहिणीला घेऊन उपचारासाठी निघाले होते. ते मिरजजवळ आल्यानंतर चौघांनी त्यांना अडविले. तुमच्या गाडीचे फायनान्स कंपनीचे हप्ते थकले आहेत, त्यामुळे तुमची गाडी जप्त करून ती पार्किंग यार्डमध्ये लावावी लागेल असे सांगितले. तसेच गाडी जप्त करण्यासाठी 12000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले त्यानंतर संशयतानी शितलकुमार माने यांच्या दुचाकीच्या नंबर प्लेटची मोडतोड केली. त्यानंतर गाडी सोडण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून ऑनलाईन 8000 रुपये घेतले.याबाबत माने यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस तपास करत होते. खाजगी फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्यानंतर वाहन ओढुन नेण्याचे कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतांना, वाहन धारकांस धमकावून त्यांच्याकडून चौघानी 8 हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे चौघाना अटक करण्यात आली आहेत.
*...तर क्रमांक '११२'वर संपर्क साधा*
फायनान्स कंपनीचे हप्ते थकले म्हणून वाहन जबरदस्तीने ओढून नेण्याचे कसलेही अधिकार कोणालाही नाहीत. तसेच वाहन जप्त करण्याची धमकी देत तडजोड करून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा धमक्यांना बळी पड्डू नका. असे कृत्य कोणत्या फायनान्स कंपनीचे कर्मचारी करीत असतील, तर तातडीने '११२' क्रमांकावर तक्रार करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.